विक्रम गोखले यांच्या मृत्यूचे खोटे वृत्त व्हायरल

त्यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त खोटं असल्याची माहिती दिली.

विक्रम गोखले यांच्या मृत्यूचे खोटे वृत्त व्हायरल

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. पुढे मात्र संध्याकाळपासून सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल हाऊ लागले. या वृत्तामुळे सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहू लागले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त खोटं असल्याची माहिती दिली. विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी माध्यमांसमोर येऊन घटनेमागचे नेमकं सत्य सांगितलं आहे.

विक्रम गोखले हे ५ नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत. त्यांच्यात थोडी सुधारणा झाली पण पुन्हा घसरली आणि काल दुपारपासून ते कोमामध्ये गेले अशी माहिती विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी दिली.

विक्रम गोखले हे बुधवारी दुपारपासून कोमात गेलेले आहेत, ते तेव्हापासून स्पर्शालाही प्रतिसाद देत नाही आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून पुढील उपचार कसा करायचा, याबाबतचा निर्णय डॉक्टर्स घेणार आहे. तसेच त्यांच्या मृत्यूचे फिरत असलेले वृत्त खोटे असल्याचंही वृषाली गोखले यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : 

‘काँग्रेस म्हणजे घराणेशाही’

दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?

शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरावे लागते खारे पाणी

‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर

विक्रम गोखलेंचे अनेक अवयव निकामी झाले असून त्यांना हृदय आणि किडनीशी संबंधित समस्या जाणवत आहेत. विक्रम गोखलेंची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची परदेशात राहणारी मुलगी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे.
दरम्यान, विक्रम गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी रंगभूमी, टीव्ही आणि मराठीसह हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Exit mobile version