राज्याच्या पोलिस महासंचालकांच्याच नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
फेक अकाऊंटवरून आरोपीने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. फेक फेसबुक खातं उघडणारा आरोपी महफुज अजीम खान याला उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
संजय पांडे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन आरोपीने अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर आलं आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊण्ट तयार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलीस महासंचालकांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार झाल्याने सायबर विभागाने तात्काळ तपास सुरु करून आरोपीला बेड्या ठोकल्या. तसेच संबंधित आरोपीला आता २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सायबर पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेश येथून महफूज अजीम खान या तरुणाला ताब्यात घेतले. या अकाऊंटबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने पोलिसांनी अटक करून त्याला मुंबईत आणले. त्याने या अकाऊंटवरून अनेकांना रिक्वेस्ट पाठविल्याचे समोर आले असून यापैकी काहींची फसवणूक झाली असाही एक अंदाज आहे.
हे ही वाचा:
लोकसंगीताला अधिक उजळवणार पवनदीप
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर असलेले संजय पांडे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.