‘पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणा देणारा फैजल निसार उर्फ फैजान आता ‘भारत मातेचा जयघोष’ जयघोष करताना दिसत आहे. मंगळवारी (२२ ऑक्टोबर ) फैजानचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो जबलपूर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तिरंग्याला सलामी देताना दिसत आहे. या व्हिडीओमधून फैजानची गुर्मी उतरल्याचे दिसत आहे.
अलीकडेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना तिरंग्याला सलामी देण्याची आणि भारत मातेचा जयघोष करण्याची अट घातली होती. त्यानुसार त्याला दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी पोलीस स्टेशन गाठावे लागेल आणि तिरंग्याला २१ वेळा सलामी द्यावी लागेल आणि ‘भारत माता की जय’ म्हणावे लागेल. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ही अट कायम राहणार आहे.
या अटीचे पालन करण्यासाठी फैजानने २२ ऑक्टोबरला पहिल्यांदा पोलिस ठाणे गाठले. मीडियाशी बोलताना तो म्हणाला, “भारत माता की जय. मी माझी चूक मान्य करतो. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेन. मी पुन्हा अशी चूक करणार नाही.”
पोलिस स्टेशन प्रभारी मनीष राज भदौरिया यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, “निर्धारित अटींनुसार पहिला मंगळवार होता, त्यामुळे फैजान पोलिस ठाण्यात आला होता. अटीनुसार त्याने २१ वेळा राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि ‘भारत माता की जय’चा नारा दिला. अटींनुसार त्याला दर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत यावे लागणार आहे.
हे ही वाचा :
साक्षी मलिक म्हणते, बृजभूषणना हटविण्यासाठी बबिताने आंदोलनाची फूस लावली!
हिंदकेसरी पैलवान अभिजित कटकेच्या घरावर छापा!
क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील करत होते धर्मांतरण; खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द
दरम्यान, पाकिस्तान झिंदाबादचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फैजानला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याने हा खोटा खटला असल्याचे सांगत जामिनासाठी अपील केले होते. मात्र, सुनावणीदरम्यान त्याचा खोटेपणा उघड झाला. यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार पालीवाल यांनी त्याला सशर्त जामीन मंजूर करताना सांगितले होते की, या मागचा एकच उद्देश आहे, ज्या देशात आपला जन्म झाला त्या देशाविषयी आपल्या मनात आदर जागृत करणे हा आहे.
या प्रकरणी १७ मे २०२४ रोजी मिसरौड पोलीस स्टेशन, भोपाळ येथे एफआयआर नोंदवण्यात आला होता. तपासानंतर ट्रायल कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यावेळी एक व्हिडिओ क्लिप सादर करण्यात आली होती, ज्यामध्ये आरोपी स्पष्टपणे घोषणा देत असल्याचे दिसून आले. तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, आरोपींवर यापूर्वी १४ गुन्हे दाखल आहेत.
#WATCH | Madhya Pradesh: An accused man, Faizal Nisar alias Faizan salutes the Tiranga and raises Bharat Mata ki Jai slogans at Jabalpur Police Station, as part of his bail conditions. He was purportedly seen shouting the slogan "Pakistan Zindabad India Murdabad" in a video.
The… pic.twitter.com/WLVSJ5sm7K
— ANI (@ANI) October 22, 2024