फडणवीसांनी शब्द पाळला, कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली उपस्थिती!

प्रवीण दरेकर, सुजय विखे पाटील, राम शिंदे देखील सोहळ्याला उपस्थित

फडणवीसांनी शब्द पाळला, कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली उपस्थिती!

८ वर्षांपूर्वी म्हणजेच १३ जुलै २०१६ ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील तीनही आरोपीना २०१७ साली फाशीची शिक्षा झाली होती. या घटनेतील पिडीत तरुणीच्या बहिणीचे आज लग्न पार पडले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते. विशेष म्हणजे, त्यावेळी फडणवीसांनी पिडीत तरुणीच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी स्वतः घेत सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची ग्वाही त्यांच्या कुटुंबाला दिली होती. अखेर दिलेल्या शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला. यावरून भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी ट्वीटकरत आमचा नेता शब्दांचा पक्का असल्याचे म्हटले आहे.

प्रवीण दरेकर ट्वीटकरत म्हणाले, शब्दांचे पक्के, असे आहेत आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कोपर्डीत ८ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द दिला होता.

आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा, असे दरेकर म्हणाले. 

या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी असल्याचे दरेकर यांनी म्हटले. या सोहळ्याला सुजय विखे पाटील, राम शिंदे देखील उपस्थित असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. 

हे ही वाचा : 

लोकशाहीवरून विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान पवारांनी करू नये! 

बांगलादेशांतील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात मीरा भाईंदर, घाटकोपर, ठाण्यात मोर्चे!

मोहम्मद युनूस नोबेल पारितोषिकासाठी पात्र नाहीत, पुरस्कार काढून घ्या!

लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याची दांडी का उडविली?

 

 

Exit mobile version