महाराष्ट्रात आतापर्यंत मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. मराठा नेते म्हणून ते मिरवत होते, त्यांनी काय केले, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
आमदार खोत म्हणाले, मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, सारथी संस्था या माध्यमातून २० विद्यार्थी युपीएसीमध्ये आले. अशा अनेक योजना मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्याकडे राजकीय दृष्टीकोणातून न पाहता, राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदाने राहिला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांना आपली विनंती आहे की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू, असे खोत म्हणाले.
हेही वाचा..
नीती आयोगाच्या बैठकीत ममता बॅनर्जींची नौटंकी
सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार!
सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
विधानपरिषदेतील नवनिर्वाचित ११ उमेदवारांनी घेतली शपथ !
कोणतही आंदोलन चालवत असताना सरकार आपल्याशी बोलत नसेल तर आंदोलन आक्रमक करायचे असते. सरकार आपल्याशी बोलत असेल तर संवाद आणि चर्चा करावी. यातून मार्ग निघेल. मी ऊसाचे, दुधाचे, सोयाबीनचे आंदोलन केले, कळवा जेलमध्ये गेलो, येरवाड्यात गेलो, लाठ्या काठ्या खाल्या. पण आंदोलन कुठे थांबवायचे हे जर समजले तर ज्यांच्यासाठी आंदोलन करतो त्यांना न्याय मिळतो असे सदाभाऊ खोत म्हणाले.
आमदार खोत म्हणाले, मला शेतीच्या बांधावरुन विधानभवनाच्या बांधावर उभे केले आहे. त्यामुळे भाजपसह आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. या पदाच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी घटकाला न्याय देऊ, असेही आमदार खोत म्हणाले.