फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला टाकले मागे!

सर्वोच्च परदेशी गुंतवणुकीचे श्रेय फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्र्यांना

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला टाकले मागे!

एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रात आलेल्या सर्वाधिक एक कोटी ८४ लाख कोटी रुपयांच्या थेट परदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राने अन्य सर्व राज्यांना पिछाडीवर टाकले आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांनी सर्वाधिक परदेशी गुंतवणुकीचे श्रेय एकट्या सध्याच्या सरकारचे नसल्याचा दावा केला होता. फडणवीस यांनी ज्या कालावधीचा उल्लेख केला आहे, त्यातील १५ महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, असे दानवे म्हणाले आहेत. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण १.१९ लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत ३६ हजार ६३४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. तर, जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत २८ हजार ८६८ कोटी रुपये गुंतवणूक झाली. तर, एप्रिल ते सप्टेंबर २०२३मध्ये ६५ हजार ५०२ कोटींची परदेशी गुंतवणूक झाली. हे प्रमाण कर्नाटक, नवी दिल्ली आणि गुजरात या राज्यांना मिळालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे.

‘कर्नाटक, दिल्ली आणि गुरजातची तुलना केल्यास महाराष्ट्र त्यांच्या कितीतरी पटीने पुढे आहे आणि त्यांच्यामधील अंतरही खूप आहे. परदेशी गुंतवणुकीचा विचार केल्यास महाराष्ट्र हे सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सन २०२२-२३मध्ये महाराष्ट्राने १.८९ लाख कोटींची एकूण थेट परदेशी गुंतवणूक मिळवली. सन २०२३-२४मध्येही महाराष्ट्राची आघाडी कायम आहे,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड’ या अहवालात महाराष्ट्राने एफडीआयच्या रूपात ३६ हजार ६३४ कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचे नमूद करण्यात आले आहे,’ असे फडणवीस यांनी ‘एक्स’वर नमूद केले होते.

हे ही वाचा:

राष्ट्रीय खेळांमध्ये डोपिंगमध्ये अडकले २५ खेळाडू

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचे की नाही?

महाराष्ट्र इसिस मॉड्युलच्या ६ जणांविरुद्ध आरोपपत्र

बर्गरमुळे भारतीय टीमचे सँडविच

आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये कर्नाटकमध्ये एकूण १.६४ लाख कोटी रुपयांची थेट गुंतवणूक झाली होती. त्याखालोखाल महाराष्ट्रात ११५ लाख कोटी तर, नवी दिल्लीत ६० हजार ८३९ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक झाली होती. तर, २०२२-२३मध्ये महाराष्ट्राने १.१९ लाख कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करून आघाडी मिळवली होती. त्यापाठोपाठ कर्नाटक (८४ लाख कोटी) आणि दिल्लीने (६० लाख कोटी) बाजी मारली होती. तर, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात (एप्रिल ते सप्टेंबर २०२३) महाराष्ट्राने आतापर्यंत ६६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक (२४ लाख कोटी) आणि दिल्लीचा (२२लाख कोटी) क्रमांक लागतो.

तर, महाराष्ट्रात ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत ४.७३ लाख कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक झाली. त्यापाठोपाठ कर्नाटक (३.५९ लाख कोटी), गुजरात (२.५८ लाख कोटी) आणि दिल्ली (२.१६ लाख कोटी) रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. देशभरातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा ३० टक्के असून त्यापाठोपाठ कर्नाटकचा २३ टक्के तर गुजरातचा १६ टक्के आणि दिल्लीचा १४ टक्के आहे. तर, करोनाकालावधीतही ठाकरे यांनी सर्वाधिक एफडीआय मिळवण्याची कामगिरी केली. ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली, असा दावा दानवे यांनी केला आहे.

Exit mobile version