पुणे नाशिक अंतर आता कापता येणार ‘हायस्पीड’

देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार

पुणे नाशिक अंतर आता कापता येणार ‘हायस्पीड’

पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाला रविवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली. केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी हा प्रकल्प प्रतीक्षेत होता. अखेर ही मान्यता मिळाल्यामुळे ही दोन शहरे आणखी जवळ येणार आहेत शिवाय त्याचा प्रवासही सुखद होईल.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले आहेत. तसेच या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला नवी दिशा प्राप्त होईल, चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

मोदी सरकारविरोधात टीका करणारी अमेरिकन सदस्य ओमारची हकालपट्टी

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी पंतप्रधानपदाबद्दल केली ही भविष्यवाणी

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १ हजार ४५० हेक्टरपैकी ३० हेक्टरपेक्षा अधिक खासगी जागा ही संपादित करण्यात आली आहे. याबाबत फडणवीस यांनी ट्विट केले आहे की, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल मी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल.

पुणे नाशिक असा थेट रेल्वेमार्ग नसल्यामुळे ही दोन्ही शहरे गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते आहे. त्यासाठी सहा ते सात तासांचा जादा वेळ लागतो. तो वेळ कमी करण्यासाठी मंत्रालयाने ही संकल्पना अमलात आणली आहे. हा मार्ग अहमदनगर जिल्ह्यालाही जोडणारा असल्यामुळे तिथेही विकास होऊ शकेल. शेतकऱ्यांच्या शेतमालाची ने आण करण्यासाठी विशेष करून या मार्गाचा उपयोग होऊ शकेल.

या प्रकल्पाची ही वैशिष्ट्ये

 

Exit mobile version