‘शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केलेलेच नाही’

महाराष्ट्रात सुरू झालेल्या वादविवादावर प्रतिक्रिया

‘शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केलेलेच नाही’

छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विधान केले होते. या विधाना वरून राज्यात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यात सुरू असलेल्या टीकेला फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

फडणवीस म्हणाले की, आपण त्रिवेदी यांचे वक्तव्य नीट ऐकलेले आहे. यामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने महाराजांनी माफी मागितलीय, असे म्हटलेले नाही असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचाही असाच विपर्यास करण्यात आला होता. त्यालाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

“मला वाटत नाही की, राज्यपालांच्या मनातही काही शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित काढण्यात आले आहेत. पण राज्यपालांच्यादेखील मनात असे कुठलेही भाव नाहीयेत असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
“जोपर्यंत सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आणि आमच्या सर्वांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही” असे म्हणत त्यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

हे ही वाचा:

मोदी हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत, आम्ही कुणावरही नियंत्रण ठेवत नाही

‘वाहिन्यांवरील मराठी पत्रकार मुली साडी न नेसता शर्ट-ट्राउजर का घालतात?’

राज्यात आता पांडुरंगाची ‘शिवसेना’

‘ट्रान्सजेंडर डे’ च्या दिवशी अमेरिकेत क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार

 

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्रात हलकल्लोळ माजविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड यांनी विशेष करून गदारोळ केला. राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात तत्कालिन सरकार असताना अनेकवेळा खटके उडत होते. त्यामुळे राज्यपालांच्या भाषणातील वाक्ये शोधून त्यावरून गोंधळ माजविण्याचे तंत्र आता काही पक्षांनी वापरण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version