देशभरात कोविड-१९ विरुद्धच्या लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात देखील लसीकरण चालू आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज लस घेतली.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला. याबाबत त्यांनी ट्वीटरवरून माहिती दिली आहे. याबरोबरच त्यांनी पात्र व्यक्तींना लस घेण्याचे देखीन आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात
गोव्यातही महाराष्ट्राच्या दुप्पट चाचण्या
‘या’ तेलगू अभिनेत्रीचे मशिदीवर बिनधास्त बोल
त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जे जे रुग्णालयात जाऊन आज मी कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतला. हे वॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, ही माझी सर्वांना विनंती आहे.
जे जे रुग्णालयात जाऊन आज मी कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतला.
हे वॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, ही माझी सर्वांना विनंती आहे.#COVID19Vaccination #COVID19 pic.twitter.com/IVEPwRwdrT— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 19, 2021
देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच आमदार प्रविण दरेकर यांनी देखील लस घेतली आहे. त्यांनीदेखील जे. जे. रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला. याबाबत त्यांनी ट्वीटरवरून माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते मा. @mipravindarekar यांनी आज जे.जे.रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. @BJP4Maharashtra pic.twitter.com/Ck2bQ9wmOM
— OfficeOfPravinDarekar (@officeofPD) March 19, 2021
देशभरातील कोविड विरुद्धच्या लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरूवात झाली. त्यानंतर १ मार्चपासून या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. सुमारे ३ कोटी लोकांना दिनांक १८ मार्च पर्यंत लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना देखील लस देण्यात येत आहे.