सत्तासंघर्षानंतरचे शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्प. देवेंद्र फडणीस यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडून विरोधकांची दाणादाण उडवली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य, रस्ते, महिला, वाहतुक अशा विविध योजनांनी घोषणांचा पाऊस पाडला. यात वाहतुक व्यवस्थेसाठी विशेष तरतुदी करण्यात आली आहे.
नुकताच अजित पवार यांनी विधान भवनात एक व्हायरल झालेला एसटी बसचा फोटो दाखवून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. एसटीच्या ताफ्यातील बसेसची दुरावस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन असे अनेक प्रश्न सध्या महामंडळापुढे दत्त म्हणून उभे आहेत. नुकताच वेतनाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने यावर तोडगा निकालात काढला आहे. शिंदे-फडणवीस यांचे भाजपा-शिवसेनेच्या मदतीने एसटी महांमडळाचे रुतलेले चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
हेही वाचा :
तब्बल ३६,००० कोटींचा डोस.. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार
महाराष्ट्राचे वाळवंट होऊ नये म्हणून नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेतीचा पुरस्कार
एसटीला गाळातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. आज अर्थसंकल्पात एसटी महामंडळाला ५,१५० इलेक्ट्रीक बसेसची घोषणा यावेळी अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लिक्वीड डिझेलच्या ५,००० बसेसही मिळणार आहेत. एसटीच्या १०० बस स्थानकांचे आधुनिकरण करण्यासाठी सुमारे ४०० कोटींची घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. एसटीचे गेले अनेक वर्षे भिजत घोंगडं याआधीच्या सरकारने ठेवले होते. सध्या महामंडळाकडे वापरात १५ हजार ६६३ गाड्या असून त्यातील २३१ गाड्या भाड्याच्या आहेत. त्या पुरेशा नाहीत, अपुऱ्या पडताहेत. या नवीन गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यास यावर तोडगा मिळणार आहे.
राज्याच्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीटामध्ये सरसकट पन्नास टक्क्यांची सूट देण्यात आलीय. तसंच लेक लाडकी या महत्त्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आलीय.