प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतलेल्या एका प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. त्यावेळी लोकसंख्येचे काय करायचे असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारल्यावर फडणवीस म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रण करताना सक्ती करावी लागेल. लोकसंख्येची रचना आहे ती रचना ही बदलणार नाही. पण फक्त ती रचना एकतर्फी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. चीनमध्ये आज जो प्रश्न निर्माण झाला, तो त्यामुळेच. चीनने प्रगती केली पण आता त्यांच्याकडे वर्किंग क्लास नाही. अवलंबून असलेले लोक जास्त आहेत. काम करणारे कमी. पण आपण लोकसंख्येच्या नियंत्रणाबद्दल कायदा केला पाहिजे, हे माझे वैयक्तिक मत आहे.
नाना म्हणाले की, १०९२ आत्महत्या विदर्भात झालेल्या आहेत. किती सहजपणे आपण या बातम्या वाचतो. पण प्रत्येक जण एकमेकांकडे बोटे दाखवतो. शेतीप्रधान देश आहे. परवडत नाही कुठले पीक लावायचे हे सांगणारे लोक हवेत. वर्षानुवर्षे तसेच जगत आलो आहोत. परवडत नाही म्हणून जमीन विकावी लागत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आत्महत्या होऊच नयेत यासाठी ११ हजार कोटींची योजनेला मंजूरी दिली. ओलिताखाली जमीन येईल. दुष्काळग्रस्त भागात पाणी जाईल अशी योजना. जोडधंदा पूरक धंदा मिळेल का याची चर्चा झाली. विशेष कृती आराखडा प्रयत्न सुरू आहे. मराठवाडा, विदर्भात प्रमाण खाली आले आहे. एकेक जीव महत्त्वाचा आहे. जलयुक्त शिवार योजना बंद केली होती. पुन्हा आम्ही सुरू केली आहे.
हे ही वाचा:
नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव
बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल तलवार’
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शरद पोंक्षे यांचे शुक्रवारी व्याख्यान
बाळासाहेबांच्या शिवसेनेने आयोगासमोर ‘ही’ तीन चिन्हं केली सादर
फडणवीस म्हणाले की, जिधे सिंचन आहे तिथे आत्महत्या नाही. जलयुक्तचा शिवार प्रयोग केला. हे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणले. बुलढाण्यात पाणी आणू शकलो तर दुष्काळी पट्टा ओलिताखाली येईल. आपल्याकडे अर्धे दिवस सकाळी व रात्री अर्धे दिवस वीज देतो. म्हणून १०० टक्के फिडर सोलारवर आणतो आहोत. तीन वर्षे लागतील त्याला ४ हजार मेवॅटचे फीडर १२ तास वीज मिळेल. इतकं डिसेंट्रलाइज मॉडेल केले आहे. योजना तयार केली आहे की, जमीन भाड्याने देईल. त्याला साधारणपणे ६० ते ७५ हजार भाडे देणार आहोत. पीक नाहीए त्यापेक्षा भाडे जास्त मिळेल. त्या जमिनीवर सोलार लावून त्यातील फिडरवर शेतकरी असतील त्यांना १२ तास वीज देऊ.