छत्रपती संभाजीनगरमध्ये कारखान्याला आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये कारखान्याला आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरमधील एका कारखान्यात आग लागून सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले होते. अग्निशमन दलाची गाडीही त्वरित घटनास्थळी पोहोचली होती आणि उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. कारखान्यात मिळालेले मृतदेह रुग्णालयात पाठवले जात आहेत.

वाळुज एमआयडीसी क्षेत्रातील या कारखान्याला ही आग लागली. या कारखान्यात ग्लोव्ह्ज बनवण्याचे काम चालत असे. या कारखान्यात आग लागल्याची माहिती रविवारी पहाटे सव्वा दोन वाजता आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने संपूर्ण कारखान्याला वेढले होते. कारखान्यात पाच जण अडकले असल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन जवानांना दिली. मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी कारखान्यात पोहोचेपर्यंत त्यांनी जीव सोडला होता. ‘आम्ही घटनास्थळावरून सहा मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच आगीवर नियंत्रण मिळवले जाईल,’ अशी माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी दिली.

हे ही वाचा:

२२ जानेवारीला घराघरात दिवे लावा! दिवाळी साजरी करा!

दहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!

नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर शिवमुद्रा; नवे स्कंधचिन्ह जाहीर!

‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

१०-१५ कर्मचारी कारखान्यात झोपले होते

कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराने सांगितलेल्या माहितीनुसार, जेव्हा आग लागली तेव्हा कारखान्यात १० ते १५ कामगार होते. मात्र ते झोपले होते. आगीचे लोळ दिसताच त्यांच्यात घबराट पसरली. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर काही आतमध्येच अडकले.

Exit mobile version