मेटाची मालकी असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सेवा एका आठवड्यात दुसऱ्यांदा ठप्प झाल्या. शनिवारी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर काही काळासाठी बंद पडले होते. त्यामुळे युजर्सला अडचणी येत होत्या. डाऊन डिटेक्टरनुसार रात्री जवळपास एक वाजता हि समस्या निर्माण झाली होती. हि अडचण दूर करण्यात आली असल्याचे मेटा कंपनीने म्हटले आहे तरी देखील सर्वर जवळपास एक तास बंद पडला होता. याच आठवड्यात व्हॉटसऍप दोन तास बंद पडले होते.
शुक्रवारी माहिती देताना कंपनीने सांगितले की, कॉन्फिगरेशन बदलामुळे वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागला आहे. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डिटेक्टरच्या मते, इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरवरील ११,००० पेक्षा जास्त यूजर्सनी अँपमध्ये प्रवेश करण्यात, संदेश पाठवण्यात आणि त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करण्यात समस्या आल्याची तक्रार केली. डाऊन डिटेक्टरनुसार, हे डाऊन २८ ऑक्टोबर रोजी रात्री भारतीय वेळेनुसार एक वाजता नोंदवले गेले.
हे ही वाचा:
बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी
एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी
राज्यात बसणार सायबर गुन्ह्यांना आळा
आता वैद्यकीय शिक्षण घेता येणार मराठीत
याआधी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजल्यापासून व्हॉट्सऍप ची सेवा बंद झाली होती. चॅट्स आणि ग्रुप चॅटमध्ये मेसेज पाठवण्यापासून ते स्टेटस अपलोड करण्यापर्यंत यूजर्सना अडचणी येत होत्या. डाऊन डिटेक्टरनेही याची पुष्टी केली. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता. ज्या देशांमध्ये अमेरिका , कॅनडा, ब्रिटन , ऑस्ट्रेलिया, मलेशिया, थायलंड, सिंगापूर आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.