सीटबेल्ट घातला नसेल तर कारवाईला सामोरे जा…

सह प्रवाशांनी सीटबेल्ट लावला नसेल तर कारवाई अटळ

सीटबेल्ट घातला नसेल तर कारवाईला सामोरे जा…

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभर रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित प्रवास याबाबत देशभर चर्चा सुरु झाली. त्याच आधारावर आता चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालकासह इतर प्रवाशांना देखील सीटबेल्टचा वापरा करावा लागणार आहे. तसेच यासाठी १ नोव्हेंबर पासून सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच ज्या वाहनांमध्ये सीटबेल्ट नसतील त्यासाठी त्या वाहन चालकांनी सीटबेल्टची व्यवस्था करावी. यासाठी सरकारने १५ दिवसांची मुदत दिली होती. या मुदतीचा आज सोमवारी शेवटचा दिवस असून, १ नोव्हेंबर पासून ज्या वाहनांमध्ये सीटबेल्टचा वापर नसेल त्या वाहनकावर प्रत्यक्ष किंवा ई-चलान स्वरूपात कारवाई केली जाणार आहे.

मुंबईमध्ये चारचाकी वाहनांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना सीटबेल्टची सक्ती करण्यात आली असून, सीटबेल्टचा वापर न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. परिणामी मुंबईकरांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याबाबत चर्चाना सध्या उधाण आले. त्यामध्ये शहरात वाहनांचा वेग कमी असेल तर सीटबेल्टचा वापर कशासाठी ? पाच आसनी चारचाकी वाहनांमध्ये मागच्या तीनप्रवाशांनी सीटबेल्टचा वापर करायचा कसा ? रिक्षा, खासगी बस, शाळेच्या बस यांना सुद्धा सीटबेल्ट सक्ती असणार आहे ला? ओला, उबेर, काळी-पिवळी टॅक्सीना सुद्धा सीटबेल्ट सक्ती असणार आहे का ? तसेच सर्वच वाहतुकीच्या नियमांची सक्ती मुंबईमध्येच का ? असे प्रश्न मुंबईकरांना पडले आहेत.

याअगोदर दिल्लीसारख्या राज्यामध्ये ही वाहन चालक आणि सहप्रवाशांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता मुंबईकरांवर सुद्धा ही सक्ती १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस मोटार वाहन सुधारित कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) सीटबेल्ट न लावणे अंतर्गत चारचाकी वाहनांवर या कलमांतर्गत दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दंड हे प्रत्यक्ष किंवा ई-चलान स्वरूपात आकारण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

या सक्तीबाबत मुंबईकर मात्र नाराज दिसून येत आहेत. हेल्मेट सक्तीप्रमाणे ही सक्तीही बारगळण्याची शक्यात आहे असे मुंबईकर वाहन चालकांची शंका आहे. तसेच या सक्तीवरून मुंबई पोलीस आणि वाहन चालकांमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे. तसेच ओला, उबेर, काळी-पिवळी टॅक्सी चालकांचा सीटबेल्ट सक्तीला विरोध नाही. मात्र काळी-पिवळी टॅक्सीचालकांना टॅक्सीमध्ये सीटबेल्ट बसविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सीटबेल्ट सक्ती काळी-पिवळी टॅक्सीचालकांची नाही असे काळी-पिवळी टॅक्सीचालकांची समज आहे. मात्र सर्वच चारचाकी वाहनांवर सीटबेल्टची सक्ती बंधनकारक असून, सरसकट सर्वच वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version