बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!

इस्रायलकची कारवाई, चार दहशतवादीही ठार

बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!

इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असतानाच बेरूतमध्ये झालेल्या स्फोटात पॅलिस्टिनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासचा उपप्रमुख सालेह अल-अरौरी मारला गेला आहे. हमास आणि हिजबुल्लाहच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हमासच्या उपप्रमुखासह अन्य दहशतवाद्यांचाही मृत्यू झाला आहे. तर, ‘हा एक ड्रोनहल्ला होता. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असू शकतो,’ असा आरोप हिजाबुल्लाह संघटनेने केला आहे.

हमासच्या सैन्य शाखेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सालेह अल-अरौरी याने वेस्ट बँकमध्ये संघटनेचे नेतृत्व केले आहे. युद्ध सुरू होण्याआधीच इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर, पॅलिस्टिनी अधिकाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या इस्रायली हल्ल्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी शपथ हिजाबुल्लाहचे नेते सैयद हसन नसरल्लाह याने घेतली आहे. या स्फोटात एकूण चार जणांचा मृत्यू झाला. इस्रायली ड्रोनने हा हल्ला केला. यात अरौरी मारला गेल्याच्या वृत्ताला हिजबुल्लाहच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. या स्फोटामुळे लेबनॉन शहर आणि हिजबुल्लाहचा गड असलेले मुशरफिह शहर हादरले आहे. काही इमारतींचेही नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील इसिस दहशतवादी मॉड्यूल: दहशतवाद्यांसाठी ‘पडघा’ म्हणजे ग्रेटर सीरिया

सीएएची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच!

महुआ मोईत्रा पुन्हा अडचणीत

छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई; १४ जणांना नोटीस

जेरूसलेममध्ये अल अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकून त्याला अपवित्र करण्याचा इस्रायलने केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही हल्ले करत असल्याचा दावा हमास संघटनेने केला. इस्रायली पोलिसांनी एप्रिल २०२३मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकून तिला अपवित्र केले होते. त्यामुळे इस्रायली लष्कर सातत्याने हमासच्या तळांवर हल्ले करून अतिक्रमण करत आहे, इस्रायली लष्कर आमच्या महिलांवर हल्ले करत आहे, असा आरोप हमासने केला आहे. तसेच, अरब देशांनी इस्रायलशी संबंध तोडावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Exit mobile version