राजस्थानच्या जैसलमेरमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ असेलल्या पोखरण रेंजमध्ये शनिवारी भारतीय हवाई दलाने ‘वायुशक्ती-२०२४’ अंतर्गत युद्ध आणि हल्ला करण्याच्या क्षमतांचे प्रदर्शन केले. हवाई दलाच्या १२०हून अधिक विमानांनी यावेळी कवायतींमध्ये सबभाग घेतला. यावेळी भारतीय बनावटीचे तेजस विमान, प्रचंड हेलिक़ॉप्टर आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र यंत्रणांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.
प्रत्यक्ष युद्धभूमीवर चांगली कामगिरी करता यावी, यासाठी या कवायती करण्यात आल्या. त्यात लढाऊ विमानांनी शत्रूंचे विमान आणि जमिनीवर लक्ष्यभेद केला. त्यात धावपट्टी, रेल्वेमार्ग, उड्डाणपूल, रडार साइट्स, दहशतवादी तळ, ऊर्जा प्रकल्प आणि शस्त्रांस्त्रांच्या कारखान्याचा समावेश होता. ‘लाइटनिंग स्ट्राइक फ्रॉम द स्काय’ या संकल्पनेवर आधारित या कसरतींमध्ये आयएएफच्या लढाऊ प्लॅटफॉर्मवर दोन तासांच्या कालावधीत दोन चौरस किमी क्षेत्रामध्ये सुमारे ५० टन शस्त्रास्त्रे खाली पाडण्यात आली.
हे ही वाचा:
शिवकालीन दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मिळणार दर्जा!
कमलनाथ यांच्यानंतर मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?
यूपी: कॉन्स्टेबल भरती देण्यास निघाली ‘सनी लिओनी’!
गृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी राष्ट्रीय अधिवेशन
सुमारे १२०हून अधिक विमानांचा सहभाग या कवायतींमध्ये होता. त्यात जग्वार लढाऊ विमानाने वेगाने येऊन आणि कमी अंतरावरून दारुगोळा उद्ध्वस्त केला. सुखोई-३० ने उड्डाणपुलाला लक्ष्य केल. रफालने मिका क्षेपणास्त्र सोडून ड्रोनच्या मदतीने शस्त्रूवर हल्ला केला.या कवायतीवेळी संरक्षण दलाचे प्रमुख अनिल चौहान, हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल व्हीआर चौधरी, नौदलाचे मुख्य ऍडमिरल आर. हरि कुमार, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे हल्ले विविध पद्धती आणि दिशांमध्ये करण्यात आले.
तसेच, यात विविध युद्धसामग्री तसेच पारंपरिक बॉम्ब आणि रॉकेटचा अचूक वापर करण्यात आला, असे निवेदन हवाई दलाकडून करण्यात आले. तेजस लढाऊ विमानांनी सुरुवातीला आकाशातील लक्ष्याचा भेद करून जमिनीवरील लक्ष्यही अचूक टिपले. युद्ध क्षेत्रातील तांत्रिक प्रगती आणि अलीकडील संघर्षात मिळालेले धडे ध्यानात घेऊन संपूर्ण दक्षता घेऊन हवाई वाहतूक दलाने लांब पल्ल्याच्या मानवरहित ड्रोनचीही चाचणी केली. त्याने अचूकपणे शत्रूच्या रडार साइटला नष्ट केले,’ असेही या निवेदनात म्हटले आहे.