‘देशात ९० टक्के हिंदू राहतात, हिंदूंच्या हिताची काळजी घेणे गुन्हा नाही’

भाजप आमदार नितीश राणे यांचे वक्तव्य

‘देशात ९० टक्के हिंदू राहतात, हिंदूंच्या हिताची काळजी घेणे गुन्हा नाही’

देशात ९० टक्के हिंदू राहतात आणि हिंदूंच्या हिताची काळजी घेणे हा गुन्हा होवू शकत नाही, असे भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. देशातील कट्टरपंथी बांगलादेशी हिंदू सणांवर दगडफेक करतात. त्यामुळे याविरोधात आवाज उठवल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यास मी तयार आहे, असेही नितेश राणेंनी म्हटले आहे. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना त्यांनी वक्तव्य केले आहे.

एबीपी हिंदीच्या बातमीनुसार,  नितेश राणे म्हणाले, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार म्हणून नाही तर हिंदू म्हणून आवाज उठवत आहे आणि उठवणार. जिथे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद आहे, तिथे मी पोहोचत आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही. जो देशभक्त मुस्लिम या देशाला आपला मानतो तोच खरा मुस्लिम आहे. जेव्हा पाकिस्तानी झेंडे फडकवले गेले तेव्हा माझ्या कोकणातील मुस्लिमांनीही त्याचा निषेध केला.

हे ही वाचा :

दिल्लीत २ हजार कोटी रुपयांचे ५०० किलोहून अधिक कोकेन जप्त!

मुस्लीम समुदायाच्या वकिलांना न्यायालयाने फटकारले

भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

चाकूचा धाकाने आधी दागिने लुटले नंतर बलात्कार

झाकीर नाईक आणि मुस्लिम मौलवींनी जे म्हटले तेच रामगिरी महाराजांनी म्हटले आहे. हिंदू लोकांना त्रास द्या आणि २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र निर्माण करा, ही त्यांची योजना आहे, हे होऊ नये अशी आमची इच्छा आहे, असे नितेश राणे म्हणाले.

नितीश राणे पुढे म्हणाले, आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही. पण संध्याकाळच्या बिर्याणीच्या निमित्ताने आपले कर्तव्य विसरणारे काही अधिकारी आहेत. जेव्हा धर्म संकटात असतो तेव्हा हे अधिकारी त्या लोकांना मदत करत असतात, असे नितेश राणे यांनी म्हटले.

Exit mobile version