लष्कराच्या वाहनावर हल्ला प्रकरणात ठार झालेल्या दहशतवाद्यांची चित्रे जारी!

सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरु

लष्कराच्या वाहनावर हल्ला प्रकरणात ठार झालेल्या दहशतवाद्यांची चित्रे जारी!

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये मंगळवारी (२९ ऑक्टोबर) झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीनपैकी दोन दहशतवाद्यांच्या प्रतिमा समोर आल्या आहेत. सोमवारी लष्कराच्या वाहनावर दहशतावाद्यांनी हल्ला केला होता, त्यानंतर चकमक सुरु झाली होती.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याला सोमवारी संध्याकाळपर्यंत ठार करण्यात आले.  मंगळवारी सकाळी बॅटल-खोर भागातील जोगवान गावातील असन मंदिराजवळ झालेल्या कारवाईदरम्यान आणखी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. चकमकीनंतर लष्कराने परिसराची पाहणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला असता, दोन दहशतवादी ठार झाल्याची पुष्टी झाली. दोन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे समोर आली आहेत.

सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अखनूरच्या बटाल भागात तीन दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला चढवला होता. यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, या चकमकीत भारताच्या फँटम या चार वर्षांच्या आर्मी श्वानाचा गोळी लागून मृत्यू झाला. सुरक्षा दलाकडून परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

हे ही वाचा : 

शरद पवारांची पाचवी यादी; पंढरपूर, माढा जागेवर दिले उमेदवार

शांघायच्या ग्लोबल परिषदेत यशवंतराव चव्हाण केंद्र भारताचे प्रतिनिधित्व करणार!

घटस्फोटांचा निर्णय न्यायालयच देणार, शरीयत परिषद नव्हे!

पंतप्रधान मोदींकडून ५१ हजार नोकऱ्यांची दिवाळी भेट

Exit mobile version