सन २०१६मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नेता रुद्रेश यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)ने २ मार्च २०२४ रोजी एक मोठे यश मिळवले. प्रतिबंधित इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चा दहशतवादी मोहम्मद गौस नियाझी याला दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आली. त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेता रुद्रेश याची हत्या केल्याचा नियाझीवर आरोप आहे.
एनआयएने त्याच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. जानेवारी २०२३मध्ये, एनआयएने उघड केले की पीएफआय ने त्यांच्या ज्ञात शत्रूंची हत्या करण्यासाठी ‘सर्व्हिस टीम’ किंवा ‘किलर स्क्वॉड्स’ म्हणून ओळखली जाणारी गुप्त पथके तयार केली होती. तसेच, सन २०४७पर्यंत भारताचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले होते.
मोहम्मद घौस नियाझी हा पीएफआयचा मोठा चेहरा होता. सन २०१६मध्ये बेंगळुरूमध्ये ३५ वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रुद्रेश यांच्या हत्येत त्याचा सहभाग होता.
हत्या केल्यानंतर तो फरार झाला आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आपले तळ तयार करण्यासाठी भारत सोडून गेला. गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रथम दक्षिण आफ्रिकेत मोहम्मद घौस नियाझीचा माग काढला. यानंतर त्यांनी केंद्रीय तपास संस्था एनआयएला ही माहिती दिली. त्यानंतर एनआयएने दक्षिण आफ्रिकेशी संपर्क साधला. दक्षिण आफ्रिकेच्या तपास संस्थेने मोहम्मद घौस नियाझीला अटक केली. त्याचे आता भारतात प्रत्यार्पण करण्यात आले असून सध्या त्याला मुंबईत नेण्यात आले आहे.
सन २०१६मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रुद्रेश यांची बेंगळुरूच्या शिवाजी नगर भागात हत्या करण्यात आली होती. रुद्रेश बेंगळुरूमध्ये आरएसएसच्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.
२६ जुलै २०२२ रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेत्तारू यांची अज्ञात हल्लेखोरांनी वार करून हत्या केली. सायंकाळी उशिरा मारेकरी कर्नाटकातील बेल्लारीतील दक्षिण कन्नड येथे दुचाकीवर आले आणि त्यांनी नेत्तरू यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. पोल्ट्री व्यवसाय करणारे प्रवीण नेतारू हे घरी परतत असताना हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले.
हे ही वाचा:
भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज!
पीओकेमधील निदर्शनांपुढे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले; निधी देण्याची घोषणा
पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपशी संपर्कात असणारा नांदेडमधून ताब्यात
पंतप्रधान नव्हे, राहुल गांधी यांच्यासोबत वादविवादासाठी भाजपकडून रायबरेलीतील तरुण नेत्याची निवड
या हिंदू नेत्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांना वाचवता आले नाही.‘तपासात असे आढळून आले आहे की पीएफआयने आपल्या ‘ज्ञात शत्रूं’ची हत्या करण्यासाठी सर्व्हिस टीम्स किंवा किलर स्क्वॉड्स नावाच्या गुप्त पथकांची स्थापना केली होती,’ एनआयएने आरोपपत्रात असे नमूद केले होते. ‘दहशतवाद, जातीय द्वेष आणि समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी आणि २०४७पर्यंत इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या त्याच्या अजेंडाचा भाग म्हणून हे केले गेले,’ असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.
आरोपपत्रासार, पीएफआयच्या गुप्त टीम किंवा ‘सर्व्हिस टीमट सदस्यांना शस्त्रे, हल्ल्याचे प्रशिक्षण आणि विशिष्ट समुदाय आणि गटांशी संबंधित लोक/नेते शोधण्याचे, त्यांची यादी तयार करण्याचे आणि पाळत ठेवण्याचे प्रशिक्षण मिळाले. या ‘गुप्त संघां’च्या प्रशिक्षित सदस्यांना पीएफआयच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या लक्ष्यांना ठार मारण्याची किंवा हल्ला करण्याची सूचना दिली.
सन २०१६मध्ये रुद्रेशची हत्या आणि त्यानंतर पीएफआयचे जिल्हाध्यक्ष असीम शरीफ यांच्या अटकेनंतर हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना मारण्याचे प्रशिक्षण मिळालेल्या या ‘सर्व्हिस टीम्स’ची स्थापना झाली असल्याचे समजते. शरीफ यांच्या अटकेनंतर पीएफआयने मुस्लिमांची भरती सुरू केली आणि त्यांना मशिदी, मदरसे आणि शाळांमध्ये युद्ध आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. रुद्रेशच्या हत्येचा कट यशस्वी झाल्यानंतर हे ‘डेथ स्क्वॉड’ तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
२०१९मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने आरएसएस नेता रुद्रेश यांच्या हत्येप्रकरणी असीम शरीफ यांच्यावर आरोप निश्चित करण्याच्या विरोधात केलेली याचिका फेटाळली. शरीफ यांनी आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला असता, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर असहमती व्यक्त केली होती आणि संघाचे नेते रुद्रेश यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा असल्याचे नमूद केले होते. रुद्रेशच्या हत्येचा कट रचण्यात असीम शरीफ हा सूत्रधार होता आणि त्याच्या स्पष्ट सांगण्यावरून ही हत्या झाली होती.
ऑक्टोबर २०१६मध्ये, बेंगळुरू पोलिसांनी चार दहशतवाद्यांना अटक केली होती, ज्यांचा रुद्रेशच्या हत्येमध्ये त्यांचा थेट सहभाग होता. त्यातील मोहम्मद मजहर (३५) आणि वसीम अहमद (३०) या मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी रुद्रेशला लक्ष्य केले होते. या प्रकरणी मुजीब आणि इरफान या इतर दोघांना अटक करण्यात आली. ते रुद्रेशच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते आणि तेही दुसऱ्या दुचाकीवर गुन्हेगारीच्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, रुद्रेशची हत्या करण्यासाठी हे चौघेही अमीन शरीफ यांच्या थेट सूचनेवरून कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.