मालदीवचे विरोधी पक्ष एमडीपी पक्षाचे खासदार मिकेल अहमद नसीम यांनी पंतप्रधान मोदींवर टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना हटवण्याची मागणी केली आहे.तसेच या संपूर्ण घटनेबद्दल मुइज्जू सरकारने औपचारिक माफी मागावी, असे मिकेल अहमद नसीम यांनी म्हटले आहे.
मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद थांबायचं नाव घेत नाहीये. मालदीवच्या प्रमुख विरोधी पक्षाने सरकारला सर्व बाजूंनी घेरले आहे. विरोधी पक्ष एमडीपी पक्षाचे खासदार मिकेल अहमद नसीम यांनी या संपूर्ण घटनेवर परराष्ट्रमंत्र्यांकडून जाब विचारण्याचा प्रस्ताव मांडला आहे.या प्रस्तावात पीएम मोदींवर टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण घटनेबद्दल मुइज्जू सरकारने औपचारिक माफी मागण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्याने केली आहे.
हे ही वाचा:
राममंदिरात सोन्याचे दार लागले!
माटुंग्यात चेंडू लागून क्षेत्ररक्षकाचा मृत्यू
गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाने केली बँक मॅनेजर प्रेयसीची हत्या
बांग्लादेश चीनच्या कह्यात जाणार नाही!
इंडिया टुडे टीव्हीला नसीम यांनी मुलाखत दिली.ते म्हणाले की, या मुलाखतीत चीनच्या संदर्भात श्रीलंकेत काय घडले याचीही त्यांनी सध्याच्या सरकारला आठवण करून दिली. “मला वाटते की आपल्या शेजाऱ्यांकडून धडा घेणे चांगले आहे.ते पुढे म्हणाले की, मला वाटते की, सरकार चीनमध्ये व्यस्त असताना , सामंजस्य करार आणि सर्व प्रकारच्या करारांवर स्वाक्षरी करत आहे ज्याची आम्हाला गोपनीय माहिती नाही, मला वाटते की मालदीव म्हणून आम्ही काय केले जात आहे यावर बारकाईने लक्ष ठेवणे महत्वाचे आहे.
दरम्यान, मालदीव-भारत वाद चिघळत चालला आहे.पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना निलंबित आले होते.मालदीवला याचा फटका बसत आहे.मात्र, मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.