पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘इंडिया टुडे’ने नुकतीच ‘न्यूजमेकर ऑफ द इयर २०२३’म्हणून निवड केली. या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेचे अध्यक्ष आणि संपादक अरुण पुरी, उपाध्यक्ष काली पुरी आणि समूह संपादकीय संचालक राज छेंगप्पा यांनी त्यांची दीर्घ मुलाखत घेतली. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोख मते मांडली.
गेल्या वर्षी कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले, असा प्रश्न विचारल्यावर मोदी यांनी २०२३ या वर्षाच्या महत्त्वपूर्ण कामगिरींची उल्लेख केला. ‘सन २०२३मध्ये भारताचा जलद वेग खूप महत्त्वाचा ठरला आहे, कारण हाच वेग आमच्या विकसित भारताच्या प्रवासात दिशा ठरवतो. आम्ही आमच्या देशाची सुप्त क्षमता बाहेर काढली आहे. जागतिक मंचांवर भारताची लक्षणीय उपस्थिती आणि योगदान आता जाणवू लागले आहे. ज्या देशाला मागे राहिल्यासारखे वाटत होते, तो देश आता समोरून पुढे जाणारा देश बनला आहे. विविध व्यासपीठांवर स्वतःचे स्थान शोधू पाहणाऱ्या देशातून, आम्ही नेतृत्व करणारा आणि नवीन जागतिक व्यासपीठ तयार करणारा देश बनलो आहोत. आज, जागतिक एकमत स्पष्ट आहे: हा भारताचा क्षण आहे,’ असे मोदी म्हणाले.
तुम्ही आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासावर समाधानी आहात का आणि हे वर्ष तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले का, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.‘माझ्या एका वर्षातील प्रवासाचे मूल्यमापन केल्याने कदाचित योग्य चित्र स्पष्ट होणार नाही. मात्र माझी दृष्टिकोनाचा आणि योजनांचा प्रगतीशील उलगडा नक्कीच होईल. जेव्हा मी काहीतरी सुरू करतो तेव्हा मला शेवटचा बिंदू माहीत असतो. परंतु मी सुरुवातीलाच अंतिम गंतव्यस्थान किंवा ब्लू प्रिंट कधीच जाहीर करत नाही. आज तुम्ही जे पाहात आहात ते काम मी केलेले नाही. याचा खूप मोठा परिणाम सर्वांत शेवटी उलगडेल. मी एका मोठ्या कॅनव्हासवर काम करतो. एखाद्या कलाकाराप्रमाणे, मी एका बिंदूपासून सुरुवात करतो, परंतु त्या वेळी अंतिम चित्र दिसू शकत नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
३१ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सापडला जाळ्यात!
नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मुंबई पोलिसांना धमकीचा फोन!
२२ जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करूयात!
ठाण्यात रेव्ह पार्टी उधळली; १०० तरुणांना घेतलं ताब्यात
या विशिष्ट हेतूबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे उदाहरण घ्या. आम्ही १८२ फुटांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली, तेव्हा अनेकांना वाटले की गुजरात विधानसभेच्या १८२ जागांशी त्याचा संबंध आहे. निवडणुकीपूर्वी समाजाला खूश करण्यासाठी हे केले गेले, असे काही जणांना वाटत होते. परंतु सर्व वयोगटातील आणि आवडीच्या लोकांसाठी काहीतरी असलेले हे संपूर्ण पर्यटन इकोसिस्टममध्ये कसे विकसित झाले आहे, ते पाहा. काही दिवसांपूर्वी याला एका दिवसात ८० हजार पर्यटकांनी भेट दिली. मी फक्त एका गोष्टीचे वचन दिले होते, परंतु मी तेथे डझनभर गोष्टी दिल्या. ही माझी कार्यशैली आहे. जेव्हा भारत मंडपमचे काम सुरू झाले तेव्हा कोणाला वाटले नव्हते की येथे जी २० होईल. पण मी एक योजना घेऊन काम करत होतो. मी नवीन संसद भवन किंवा गरिबांसाठी चार कोटी घरे बनवण्याचे कामही समान नियोजन आणि समर्पणाने केले,’ असे मोदी म्हणाले.
भारत ही २०२३मधील सर्वांत जलदतीने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली, हे कसे साध्य झाले, याबाबतही त्यांनी विवेचन केले. ‘अनुभवाच्या बाबतीत मी माझ्या कारकिर्दीत एक अनोखा प्रवास केला आहे. मी २३ वर्षे गुजरात आणि केंद्रात शासनप्रमुख म्हणून काम केले आहे. परंतु त्यापूर्वी ३० वर्षे मी देशाच्या विविध भागांत फिरलो आणि लोकांमध्ये राहिलो. मी स्वतःला आजीवन विद्यार्थी समजतो आणि इतरांच्या अनुभवातून आणि शहाणपणापासून शिकण्यावर विश्वास ठेवतो. धोरण बनवण्याचा माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. मी सर्व अर्थतज्ञ आणि तज्ञांचे म्हणणे ऐकतो आणि त्यांचे सल्ले, माझे ‘ग्राउंड कनेक्ट’ आणि देशाचे ‘जिवंत वास्तव’ यांच्या मिश्रणातून माझी धोरणे तयार करतो. मला चांगले दिसते, म्हणून मी काही गोष्टी करत नाही. तर, ज्याचा चांगला परिणाम होईल, याबाबत मला खात्री वाटली की मी ते करतो.
गरिबीत वाढल्यामुळे आणि तळागाळातील लोकांशी जोडले जाण्याचे भाग्य लाभल्यामुळे मला लोकांचे जीवन सुधारण्यावर कसे लक्ष केंद्रित केले पाहिजे हे जाणून आहे. अशा डझनभर सुधारणांच्या परिणामांमुळेच लोकांचे जीवनमान सुधारणे, त्यांचे राहणीमान सुलभ करणे, व्यवसाय करणे सुलभ होणे तसेच, भारताच्या विकासाच्या प्रवासाला वेग आला आहे, असे मोदी म्हणाले.
भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन होईल, असा विश्वास कसा वाटतो, याबाबतही त्यांनी उत्तर दिले. आमचा ट्रॅक रेकॉर्ड स्वतःच बोलतो. सन २००१मध्ये जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा त्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे २६ अब्ज डॉलर (२.१७ लाख कोटी रुपये) होता. मी पंतप्रधान होण्यासाठी गुजरात सोडले तेव्हा गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा आकार १३३.५ अब्ज डॉलर (११.१ लाख कोटी रुपये) झाला होता आणि विविध धोरणे आणि सुधारणांचा परिणाम म्हणून, आज गुजरातची अर्थव्यवस्था सुमारे २६० अब्ज डॉलर (रु. २१.६ लाख कोटी) आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा मी २०१४ मध्ये पंतप्रधान झालो तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार दोन ट्रिलियन डॉलर (रु. १६७ लाख कोटी) होता आणि २०२३-२४च्या अखेरीस भारताचा जीडीपी ३.७५ ट्रिलियन डॉलर (रु. ३१२3लाख कोटी) पेक्षा जास्त असेल. हा २३ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्डच एक वास्तववादी लक्ष्य आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.