28 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरविशेषअवैध खाण प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयकडून समन्स!

अवैध खाण प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयकडून समन्स!

साक्षीदार म्हणून हजार राहण्याचे आदेश

Google News Follow

Related

केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना समन्स पाठवले आहे. अवैध खाण प्रकरणी अखिलेश यादव समन्स पाठवण्यात आले आहे. अखिलेश यांना साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगितले आहे.अवैध खाण प्रकरणी उत्तर देण्यासाठी उद्या गुरुवारी (२९ फेब्रुवारी) अखिलेश यादव यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे नोटिसीमधून सांगण्यात आले आहे.

२०१२-२०१६ दरम्यान हमीरपूरमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित हे प्रकरण आहे.या प्रकरणी जानेवारी २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी आणि इतरांसह अनेक अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आला होता.सरकारी कर्मचाऱ्यांनी हमीरपूरमध्ये अवैध खनिज उत्खनन करण्यास परवानगी दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या टीकास्त्रानंतर मनोज जरांगेंनी मागितली माफी

हिमाचलमध्ये काँग्रेस दुभंगली; मंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यसभेत क्रॉस वोटिंग

पिसेतल्या आगीनंतर मुंबईत ५ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात!

“ईडीकडून पाठविण्यात आलेल्या समन्सचा आदर करून त्याचे उत्तर द्यावे लागेल”

२८ जुलै २०१६ रोजी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी डीएम हमीरपूर, भूगर्भशास्त्रज्ञ, खनिकर्म अधिकारी, लिपिक, लीज धारक आणि खाजगी आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध १२०B, ३७९, ३८४, ४२०, ५११, भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम १३ (१), (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, ५ जानेवारी २०१९ रोजी सीबीआयने १२ ठिकाणी छापे टाकले होते.या छापेमारीत बरीच रोकड आणि सोने जप्त करण्यात आले होते.या प्रकरणी सीबीआयने साक्षीदार म्हणून सीआरपीसी १६० कलमांतर्गत अखिलेश यांना बोलावले आहे.कारण अखिलेश यादव २०१२ ते २०१७ पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.तसेच २०१२ ते २०१३ पर्यंत ते राज्याचे खाण मंत्री होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा