केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनांवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या परस्पर शुल्काच्या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडालेली नसता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेत असे म्हटले आहे की, सुधारित उत्पादन शुल्क मंगळावर, ८ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. आदेशानुसार पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जनतेला माहिती दिली की, पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर समान राहतील. किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे. “पीएसयू ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी कळवले आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, आज उत्पादन शुल्क दरात वाढ झाली आहे,” असे त्यांनी एक्स वर लिहिले. आदेशात म्हटले आहे की, केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा, १९४४ च्या कलम ५अ आणि वित्त कायदा, २००२ च्या कलम १४७ अंतर्गत सार्वजनिक हितासाठी वाढीव शुल्क लादले आहे.
The #ExciseDuty increase of Rs. 2 per litre on #petrol and #diesel by Central Government will not be passed on to the consumers.
On one hand, this will insulate the customers from the price hike while on the other hand, the collected amount may be utilised towards under-recovery…
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) April 7, 2025
हे ही वाचा..
चूक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचीच, अहवालातून आले समोर
“मला तुरुंगवासही होऊ शकतो” ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाबाबत व्यक्त केली चिंता
वक्फ विधेयकाचे समर्थन केले, भाजपा नेत्याचे घर पेटवले
पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ जाहीर केल्यानंतर काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे. जागतिक तेलाच्या किंमती घसरल्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेल आणि इंधन निर्यातीवरील अनपेक्षित नफा कर काढून टाकला. दरम्यान, ७ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९४.७७ रुपये, मुंबईत १०३.५० रुपये, चेन्नईत १००.८० रुपये आणि कोलकातामध्ये १०५.०१ रुपये आहे. दुसरीकडे, डिझेलची किंमत नवी दिल्लीत प्रति लिटर ८७.६७ रुपये आणि चेन्नईत ९२.३९ रुपये, मुंबईत ९०.०३ रुपये आणि कोलकातामध्ये ९१.८२ रुपये आहे.