28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषयूपीएससीद्वारे आयोजित परिक्षांवर 'एआय' आधारित सीसीटीव्ही यंत्रणेची असणार नजर

यूपीएससीद्वारे आयोजित परिक्षांवर ‘एआय’ आधारित सीसीटीव्ही यंत्रणेची असणार नजर

‘एआय’ आधारित चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या यंत्रणेचाही वापर केला जाणार

Google News Follow

Related

देशात हल्लीच ‘नीट’, ‘नेट’ परिक्षांमधील गोंधळ समोर आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून आता केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) आयोजित केल्या जाणाऱ्या विविध परीक्षांदरम्यान फसवणुकीचे प्रकार होऊ नयेत यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा संबंधित फसवणूक आणि तोतयागिरीला प्रतिबंध करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच ‘एआय’ आधारित चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या यंत्रणेचाही वापर केला जाणार आहे.

अलीकडेच ‘नीट’, ‘नेट’ परीक्षांदरम्यान पेपरफुटीचे प्रकरण समोर आले असून या प्रकरणाचे धागेदोरे दूरवर पसरल्याचे लक्षात आले आहे. यासंबंधी कठोरपणे तपास सुरू आहे. त्यामुळेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनियमिततांचे आरोप आणि त्यापूर्वी पेपरफुटीच्या घटना या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

यूपीएससी’ने, ३ जून रोजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्याोगांकडून निविदा मागवल्या आहेत. त्यामध्ये आधारवर आधारित बोटांच्या ठशांचे प्रमाणीकरण आणि उमेदवारांच्या चेहऱ्याची ओळख पटवणे आणि ई-प्रवेश कार्डांचे ‘क्यूआर कोड स्कॅनिंग’, तसेच परीक्षा प्रक्रियेदरम्यान वापरण्यासाठी थेट ‘एआय’ आधारित सीसीटीव्ही देखरेख सेवा यांचा समावेश आहे.

परीक्षेदरम्यान प्रवेशद्वार किंवा निर्गमन द्वाराजवळ कोणत्याही हालचाली लक्षात आल्यास आणि वर्गखोलीतील फर्निचरची योग्य प्रकारे रचना केली नसेल तर ‘एआय’ आधारित ध्वनिचित्रफित प्रणाली इशारा देईल. तसेच कोणताही कॅमेरा ऑफलाइन असल्यास अथवा त्यामध्ये छेडछाड केल्यास किंवा स्क्रीन अडवल्यास इशारा दिला जाईल असे निविदेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने सोमवारी नुकत्याच अधिसूचित केलेल्या पेपरफुटीविरोधी कायद्यांतर्गत नियम सार्वजनिक केले आहेत. ज्यात संगणक-आधारित चाचण्यांसाठी मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, राष्ट्रीय भरती एजन्सीला (एनआरए) अनिवार्य केले आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अनुचित मार्ग रोखण्यासाठी हा कायदा बनवला आहे.

हे ही वाचा:

भारत टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत, ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या बाहेर जाणार?

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती!

भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!

आम्ही ती चूक का करू, म्हणत केजरीवाल यांना ‘सर्वोच्च’ दणका

केंद्रीय लोकसेवा आयोग ही वैधानिक संस्था असून त्याद्वारे १४ मुख्य परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय पररराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) या प्रमुख परीक्षांचा समावेश आहे. त्याशिवाय केंद्र सरकारच्या ‘अ’ आणि ‘ब’ प्रवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी दरवर्षी अनेक भरती चाचण्या आणि मुलाखतीही आयोगाकडून आयोजित केल्या जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा