29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषखार जिमखान्याच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त २८ खेळाडूंना जीवनगौरव

खार जिमखान्याच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त २८ खेळाडूंना जीवनगौरव

ऑलिम्पियन कुलवंतसिंग अरोरा यांचा समावेश

Google News Follow

Related

खार जिमखान्याच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाच्या कामगिरीने महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाचे नाव उंचावणाऱ्या आणि खार जिमखान्याचे सदस्य असणाऱ्या विविध खेळांतील २८ क्रीडापटूंना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात ८ जलतरणपटू, ७ बॅडमिंटनपटू, ३ टेनिसपटू, ३ टेबल टेनिस खेळाडू, स्क्वाश, स्नूकर आणि वॉटरपोलो या खेळांतील प्रत्येकी दोन आणि हॉकी मधील एका खेळाडूचा समावेश होता.

खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी उर्फ पॉली, उपाध्यक्ष माधवी आशर, खजिनदार विपुल वर्मा, सरचिटणीस सारिका विपुल जैन, तसेच विश्वस्त अमरजितसिंघ चड्ढा आणि अशोक मोहनानी यांच्या हस्ते खेळाडूंना शाल, चांदीचे तबक आणि झाडांचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.

 

जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते हॉकीपटू कुलवंतसिंग अरोरा यांची उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत होती. शिवाय माजी बॅडमिंटनपटू अमी घिया – शहा ज्यांनी ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते तसेच १२ वेळा दुहेरीत तर ४ वेळा मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. त्या भारताच्या पहिल्या बॅडमिंटनटू होत्या ज्यांनी आपली सहकारी कंवल ठक्कर यांच्या साथीने एडमंट येथील १९७८ च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कांस्य पदक पटकावले होते.

हे ही वाचा:

इस्रोची अवकाशात यशस्वी झेप

कोलकाता डॉक्टर हत्येप्रकरणी भाजपकडून ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी !

कुवेतमधून पत्नीला दिला तिहेरी तलाक; पाकिस्तानी महिलेशी केला विवाह, राजस्थानात अटक

पोलिसांच्या नाकाबंदीत २ कोटींचा ड्रग्स साठा जप्त, एकाला अटक

माजी बॅडमिंटनपटू संजय शर्मा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्हीलचेअर वरून या सोहळ्यात उपस्थित होते, त्यांनी चार वेळा थॉमस कप स्पर्धेत आणि चार वेळा एशियन चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते, शिवाय पाच वर्षे ते भारतीय संघाचे प्रशिक्षक देखील होते.

भारतीय स्नूकर खेळाडू यासिन मर्चन्ट जे एकमेव स्नूकरपटू आहेत ज्यांनी एशियन गेम्स मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक विजेती कामगिरी केलेली आहे त्यांचा देखील यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. टेबल टेनिस या खेळातील जुन्या जाणत्या खेळाडू नंदिनी कुलकर्णी या पुण्याहून या पुरस्कार सोहळ्यासाठी खास उपस्थित होत्या तर याच खेळातील काश्मीर पटेल यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचा आघाडीचा जलतरणपटू वीरधवल खाडे याची पत्नी आणि जलतरणपटू ऋजुता खाडे, अदिती घुमटकर, आर्यन माखिजा यांचा देखील सन्मान करण्यात आला. १० वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या वर्ष चुलानी मुजुमदार यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी तर टेबल टेनिस बरोबरच स्नूकर आणि ८ बॉल्स पूल आणि ९ बॉल्स पूल अशा चार विविध खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अतुल प्रेमनारायण ज्यांनी १९६५ च्या एशियन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले शिवाय नंतर ऑल इंडिया रेडिओ, आकाशवाणी,आणि दूरदर्शन साठी ८० ग्रँड स्लॅम स्पर्धांचे समालोचन केले ज्यात ३५ विम्बल्डन टेनिस स्पर्धा देखील समाविष्ट आहेत, त्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. एकूणच माजी महान खेळाडूंच्या मांदियाळीने स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला होता.

 

जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित खेळाडू
अमी घिया, भूषण याकूत, असिफ परपिया, नंदू नाटेकर, इक्बाल मैंदर्गी, अतुल प्रेमनारायण, संजय शर्मा (सर्व बॅडमिंटन).

रोहन गज्जर, असिफ इस्माईल, गौरव नाटेकर (टेनिस)

कश्मिरा पटेल, वर्ष मजुमदार , नंदिनी कुलकर्णी ( टेबल टेनिस)

विक्रम मल्होत्रा, मनीष चोटरांनी (स्क्वॉश)

सोनाली रेगे, ऋजुता खाडे, आर्यन माखिजा, नील रॉय, शेण पेड्डार,सिंदूर ठक्कर, अदिती घुमटकर, वरून दिवगीकर (जलतरण),

भरत मर्चंट, डॉ. शरद शेणॉय (वॉटर पोलो)

कुलवंत सिंग अरोरा (हॉकी)

यासिन मर्चन्ट, श्याम श्रॉफ (स्नूकर)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा