जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या जगमोहन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांनी १९८४-८९ आणि जानेवारी-मे १९९० अशा दोनवेळेला जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भुषविले होते. या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त होती. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या टीकेनंतर जगमोहन यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावरून हटवण्यात आले होते.

जगमोहन यांनी राज्यपाल असताना काश्मीरची परिस्थिती कठोरतेने हाताळली होती. पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान, बेनझीर भुट्टो यांनी जगमोहन यांचे तुकडे-तुकडे करण्याची धमकीही दिली होती. अत्यंत विभत्स हातवारे करत, “जग-जग-मो-मो-हन-हन कर देंगे.” अशा पद्धतीची धमकी भुट्टो यांनी दिली होती.

जगमोहन यांनी १९९६ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी नगरविकास आणि पर्यटन खात्याची जबाबदारी सांभाळली होती.

हे ही वाचा:

हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांना बंगालमध्ये तैनात करा

शरद पवारांच्या ‘अदृश्य हातांना’ पंढरपूरची एक सीट जिंकता आली नाही

पंतप्रधानांच्या या योजनेमुळे २ लाखांपर्यंतचे सुरक्षा कवच

महाराष्ट्रातील कोविड रुग्णवाढ ५० हजारांखाली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करत जगमोहन यांना श्रद्धांजली अर्पण केली. जगमोहन हे कुशल प्रशासक आणि विचारवंत होते, असेही ते म्हणाले.

Exit mobile version