भारतीय क्रिकेटसाठी नावलैकिक मिळवून देणाऱ्या १९८३ सालच्या विश्वचषक करंडक स्पर्धेत महत्त्वाची भूमिका निभावलेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (१३ जुलै) सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने शर्मा यांचे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. भारताकडून ३७ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामने खेळलेल्या शर्मा यांनी टेस्टमध्ये २ शतकांच्या मदतीने १६०६ धावा केल्या होत्या. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ८९ धावा आहेत. पण १९८३ च्या विश्वचषकात त्यांनी खेळलेले काही सामने हे आजही सर्वांच्या स्मरणात आहेत आणि त्यांच्या अप्रतिम सलामीवीराच्या भूमिकेमुळेच भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला होता.
Yashpal Sharma, a member of the 1983 Cricket World Cup-winning team, died of cardiac arrest this morning. pic.twitter.com/9GaDPMsKyZ
— ANI (@ANI) July 13, 2021
यशपाल शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरोधात सियालकोट येथील एकदिवसीय सामन्यात १९७८ मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी पहिली टेस्ट इंग्लंड विरोधात क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळली होती. शर्मा यांनी १९८५ मध्ये इंग्लंड विरोधात चंदीगढ़ येथे शेवटची वन-डे खेळली होती. तर वेस्टइंडीज विरोधात दिल्ली येथे १९८३ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
हे ही वाचा:
महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश
फकिराच्या वेशात दागिने लुबाडणाऱ्याला पकडले
एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली
भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघात कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांच्याबरोबरच यशपाल शर्मा यांच्याही कामगिरीची चर्चा केली जाते. विश्वचषक जिंकण्यासाठी भक्कम सलामी फलंदाजी भारतासाठी आवश्यक होती, त्याकरता यशपाल शर्मा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.