29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषमाजी क्रिकेटर प्रवीण कुमार थोडक्यात बचावला; कारला धडकला ट्रक

माजी क्रिकेटर प्रवीण कुमार थोडक्यात बचावला; कारला धडकला ट्रक

कारचे मोठे नुकसान झाले आहे

Google News Follow

Related

माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा मेरठमध्ये झालेल्या भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सुदैवाने, प्रवीण कुमार आणि त्यांचा मुलगा दोघेही अपघातातून थोडक्यात बचावले, त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी  प्रवीण पांडव नगर भागातून त्याच्या लँड रोव्हर डिफेंडर कारने येत असताना आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ त्यांची कार ट्रकला धडकली. वेगवान ट्रकने धडक दिली तेव्हा माजी भारतीय वेगवान गोलंदाज कुमारसह त्याचा मुलगाही कारमध्ये होता .सुदैवाने दोघेही थोडक्यात बचावले असून मात्र, कारचे फार नुकसान झाले आहे.सिव्हिल लाइन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून ट्रक चालकाला अटक केल्याची माहिती आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना कुमार यांनी अपघाताबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला की, “हे खूप वाईट झाले असते. देवाच्या कृपेने आम्ही ठीक आहोत आणि मी तुमच्याशी बोलत आहे. मी माझ्या पुतण्याला सोडायला गेलो होतो पण रात्री एका मोठ्या ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली.धडकणारी ती मोठी गाडी होती. देवाचे आभार मानतो, नाहीतर मोठी दुखापत झाली असती.”मला सुरुवातीला वाटले होते की फक्त बंपर तुटला असेल पण कारचे खूप नुकसान झाले आहे” माजी वेगवान गोलंदाजाने नमूद केले.

हे ही वाचा:

वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

शस्त्रे लुटण्यासाठी आलेल्या जमावाला लष्कराने रोखले; एक ठार

अमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक

वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही आव्हान संपुष्टात

वेगवान गोलंदाज म्हणून आपल्या कौशल्यासाठी ओळखला जाणारा प्रवीण कुमार मेरठमधील मुलतान नगर येथे राहतो. ऑस्ट्रेलियात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २००८ च्या मालिकेत भारताच्या विजयात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, प्रवीणने ६ कसोटी सामने, ६८ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI), आणि १० T२० International (T२०I) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. याव्यतिरिक्त, त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये ११९ सामन्यांमध्ये तो खेळला.

प्रवीण कुमारचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अत्यंत आदरणीय आहे आणि अशा घटनेनंतर तो आणि त्याचा मुलगा सुरक्षित असल्याचे ऐकून त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळेल. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी वेळ आहे की एक भारतीय क्रिकेट स्टार मोठ्या अपघातातून वाचला आहे. गेल्या वर्षी, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दिल्ली-डेहराडून महामार्गावर झोप लागल्यामुळे अपघातग्रस्त झाला होता. त्याची आलिशान कार रस्ता दुभाजकावर आदळली आणि त्याला आग लागली पण त्यातून तो चमत्कारिकरित्या बचावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा