23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमाजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

Google News Follow

Related

केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन झालं. आज (१६ एप्रिल) पहाटे चारच्या सुमारास त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. आपल्या कारकीर्दीत रणजीत सिन्हा यांनी सीबीआय संचालक, आयटीबीपी महासंचालक यांसारख्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती.

रणजीत सिंह १९७४ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सीबीआयचे संचालक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) चे महासंचालक पदावर कार्यरत होते. रणजीत सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. सीबीआयचे प्रमुख असताना कोळसा घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांच्यावर झाला होता.

हे ही वाचा:

टीपू सुलतान जयंती साजरी करणारी शिवसेना

राज ठाकरेंनी मानले मोदी सरकारचे आभार

मुंबईत सॅनिटाझर यंत्रणा बसविण्यासाठी जनहित याचिका दाखल

रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

ठाण्यातील जम्बो कोविड सेंटर वापराविना

२२ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांना दोन वर्षांसाठी सीबीआयचे प्रमुख बनवण्यात आलं होतं. रणजीत सिन्हा यांनी रेल्वे सुरक्षा दलाचं नेतृत्त्व तसंच पटणा आणि दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर काम केलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा