राष्ट्रगीत गातानाच वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक खाली कोसळले आणि

१९६२ च्या युद्धात सहभागी झाले होते स्वातंत्र्य सैनिक चंद्रभान मालुंजकर

राष्ट्रगीत गातानाच वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक खाली कोसळले आणि

देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवाची जाेरदार तयारी सुरू आहे. पण त्याचवेळी एक दु:खद घटना घडली आहे.

नाशिकच्या संदीपक नगर शाळेत साेमवारी एका शाळेत स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षाच्या निमित्त कार्यक्रम आ याेजित करण्यात आ ला हाेता. या कार्यक्रमात १९६२ च्या युद्धात सहभागी घेतलेले स्वातंत्र्य सैनिक चंद्रभान मालुंजकर देखील सहभागी झाले हाेते. सर्व उपस्थित राष्ट्रगीतासाठी उभे हाेते. हे राष्ट्रगीत सुरू असताना चंद्रभान मालुंजकर अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. स्वातंत्र्य दिनाच्या तयारीच्या कार्यक्रमातच स्वातंत्र्य सैनिकाच्या मृत्यू हाेण्याचा हा विचित्र याेगायाेग बघून उपस्थितांच्याही डाेळ्याच्या कडा पाणवल्या. हा व्हिडिओ बघून साेशल मिडियावर देखील दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यांच्या अमृत महाेत्सवी कार्यक्रमासाठी शाळेने ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मालुंजकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आ मंत्रित केले हाेते. सकाळी प्रभातफेरीमध्ये पण ते सहभागी झाले हाेते. कार्यक्रमात सामुहिक राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सर्वजण राष्ट्रगीत म्हणू लागले. त्यावेळी मांजुलकर देखील राष्ट्रगीत म्हणत हाेते. काही जणांनी हा क्षण आपल्या माेबाईलवर व्हिडीओ रुपाने चित्रित केला. राष्ट्रगीत सुरू असताना अचानक मांजुलकर भाेवळ येऊन पडले व बेशुद्ध झाले. मांजुलकर बेशुद्ध झाल्यावर  उपस्थित त्यांच्या मदतीला धावले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा होतोय जल्लोषात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा

हे घ्या, शरद पवारांच्या मौनाचे कारण

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

युवकांना लष्करात जाण्यासाठी केले प्रेरित

१९६२ च्या भारत- चीन युद्धात स्वातंत्र्य सैनिक चंद्रभान मांजुलकर यांनी भाग घेतला हाेता. नाशिकच्या सातपूर भागात राहणाऱ्या मांजुलकर हे अनेक माजी सैनिक संघटनांशी संबंधित हाेते. युवकांना लष्करात जाण्यासाठी प्राेत्साहित करण्यात त्यांचे माेठे याेगदान हाेते.

Exit mobile version