‘निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएममध्ये गडबड’

सर्वोच्च न्यायालयाची थप्पड

‘निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएममध्ये गडबड’

निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. याचिका फेटाळताना, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पीबी वारळे यांच्या खंडपीठाने नमूद केले की, जेव्हा लोक निवडणुकीत हरतात तेव्हाच ईव्हीएम छेडछाडीचे आरोप केले जातात.

के.ए पॉल यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती  फेटाळून लावली. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास कोर्टाने नकार दिला. ‘निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएममध्ये गडबड’, हे कसे होवू शकते?, असा सवाल सर्वोच्च नायालयाने उपस्थित केला.

हे ही वाचा : 

काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक पडला बंद!

नवी मुंबईत १८ चाकी ट्रेलर चोरीला

हेमंत सोरेन यांनी सपत्नीक घेतले नरेंद्र मोदींचे आशीर्वाद!

संसदेतील कार्यक्रमात काँग्रेसच्या राजकुमारांचा अहंकार दिसला

यावेळी याचिकाकर्ते केए पॉल म्हणाले की, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मतपत्रिका पुन्हा सादर करणे आवश्यक आहे आणि ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणाले, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते असा दावा केला होता. ईव्हीएम हॅक होऊ शकतात या इलॉन मस्कच्या दाव्याचाही त्यांनी हवाला दिला .

यावर खंडपीठाने म्हटले, जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा जगन मोहन रेड्डी यांचा पराभव होतो तेव्हा ते ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे बोलतात. पण ते जेव्हा जिंकतात तेव्हा ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आम्ही हे फेटाळून लावत आहोत, असे सांगत खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

Exit mobile version