फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले जाईल!

विरोधकांच्या ईव्हीएमवरील आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले जाईल!

महायुतीला राज्यात मोठा विजय मिळाला, मात्र विरोधक म्हणतात अतिरिक्त ७४ लाख मते आली कुठून?. ही मते कुठूनही आली नसून जनतेने ती महायुतीला दिली आणि निवडून आणले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ईव्हीएम विरोधात विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत उत्तर दिले.

ते म्हणाले,  विरोधकांनी ईव्हीएमचा फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. शरद पवारांनी जय-पराजय बघितला आहे, मात्र ते सुद्धा यामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांचे मला आश्चर्य वाटत आहे. तसेच शरद पवार म्हणतात ईव्हीएमचे असे झाले आहे की, छोटी राज्ये हे जिंकतात आणि मोठी भाजप जिंकतंय. विरोधकांनी ईव्हीएमवर बोलणे सोडून द्या, असा सल्ला ओमर अब्दुला, ममता बॅनर्जी यांनी दिला असल्याचे सांगितले. यावेळी विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

मारकडवाडी मध्ये राम सातपुते यांनी पाच वर्षे राबून २२ कोटी रुपयांची कामे केले आणि त्यांना मतदान झाले म्हणून विरोधकांकडून लोकांना धमकावले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ईव्हीएम संदर्भात शंका घेतल्या. २०१२ पर्यंत ईव्हीएम होते, यानंतर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटही आहे. कोणाला मतदान केले हे त्यावर दिसते. ईव्हीएम म्हणजे, ‘एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र’ जे महाराष्ट्राने आम्हाला दिलेले आहे. त्यामुळे यावर आता शंका घेणे म्हणजे संविधानिक संस्थांचा अनादर करणे असा होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

संयुक्त राष्ट्रीय मुक्ती मोर्चाकडून मणिपूरमध्ये करोडोंची उधळपट्टी

नोकरीच्या नावाखाली पाकिस्तानात अडकलेल्या हमीदा बानो २२ वर्षानंतर भारतात परतल्या!

“मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो”

अमोल कीर्तीकरांना न्यायालयाचा दणका; रवींद्र वायकारांची खासदारकी कायम!

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ईव्हीएमचा इतिहासही सांगितला.  ते म्हणाले, ६ ऑगस्ट १९८० रोजी ईव्हीएमचे पहिल्यांदा सादरीकरण झाले. १९ मे १९८२ रोजी ईव्हीएमचा पहिल्यांदा निवडणुकीमध्ये वापर झाला. १९९८ ला १६ विधानसभांमध्ये त्याचा वापर झाला. १९९९ ला ४६ लोकसभा मतदार संघात त्याचा वापर झाला. २००४ ला पहिल्यांदा देशातील पहिल्या लोकसभा मतदार संघामध्ये त्याचा वापर झाला. आणि पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाल्यानंतर वाजपेयी यांचे सरकार गेले आणि मनमोहन सिंग यांचे सरकार आले. २००९ मध्ये देखील ईव्हीएमचा वापर झाला आणि पुन्हा मनमोहन सिंग यांचे सरकार आले. मात्र, २०१४ मध्ये मोदी सरकार आले आणि ईव्हीएम वाईट झाले.

विरोधकांनी माझी विनंती आहे की, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा, जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती हीच होत राहील. लोकसभेत आम्ही हारलो तेव्हा ईव्हीएम दोष दिला नाही. आम्ही आत्म परीक्षण केलं, विरोधकांच्या फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक शायरी सुनावत विरोधकांना टोला लगावला.

Exit mobile version