‘EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’, असे भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. हिंदू म्हणून आपली भूमिका आणि विचार स्पष्ट असले पाहिजेत असेही मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत. सांगलीत ‘हिंदू गर्जना’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ईव्हीएमच्या नावाने विरोधका आरडाओरड करत आहेत. हिंदू समाज एकत्र येवून मतदान करतो हे पचत नाही. ईव्हीएमचा यांना अर्थाच कळाला नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’. म्हणूनच आम्ही ईव्हीएम निवडून आलो आहे.
हे ही वाचा :
स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी महाकुंभाच्या संगममध्ये करणार ‘अमृतस्नान’
हलगर्जीपणाबद्दल टोरेस घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच होणार चौकशी
दिल्लीतील शाळांना १२ वीच्या विद्यार्थ्याकडून बॉम्बची धमकी, चौकशीत मोठा खुलासा!
हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राहणार उपस्थित
ते पुढे म्हणाले, मुंबई, सौदी अरेबियावरून मला पाडण्यासाठी आले होते. याला कसेही करून पाडा नाहीतर आम्हाला विधानसभेत जगू देणार नाही. पण माझ्या इथला हिंदू समाज जागा झाला, उभा राहिला आणि मतदान केले. त्यामुळे तुमच्यासमोर मंत्री म्हणून मी आज उभा आहे. म्हणून काहीही फरक पडत नाही. आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. मला हिंदूंच्या मतांवरच निवडून यायचं आहे, बाकीच्यांची गरज नाही.
हिंदू म्हणून आपली भूमिका आणि आपले विचार स्पष्ट असले पाहिजेत. आम्ही कोणाच्या पोटावर लाथ मारत नाही, पण कोणीही आमच्या पोटावर लाथ मारू नये ही भूमिका आपली सरळ स्पष्ट असली पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.