कांस्य पदक विजेत्या लोवलिनाचे पंतप्रधानांकडून कौतूक

कांस्य पदक विजेत्या लोवलिनाचे पंतप्रधानांकडून कौतूक

महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. लवलिनानं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. त्यामुळे लवलिनाचे सर्व नेत्यांकडून कौतूक करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी लवलिनाचे कौतूक केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी ट्वीट करून तिचे कौतूक करताना म्हटले आहे की, तुझ्यामुळे देशाला अभिमान वाटत आहे. ऑलिम्पिकमधील तुझ्या कांस्य पदकामुळे देशातील अनेकांना प्रेरणा मिळाली असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटर वरून तिचे कौतूक केले आहे. ट्वीट करताना त्यांनी म्हटले आहे की, लोवलिना, उत्तम लढा दिलास. तिच्या बॉक्सिंगमधील लढ्यातील यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असेल.

हे ही वाचा:

 

मनसुख हिरेनच्या हत्येसाठी दिली होती ४५ लाखांची सुपारी

खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार

राज्यात कोरोनामुळे १५ हजार ७७९ मुलांनी गमावले पालक

शिवसेनेने मदतीचे चेक परत घेऊन दाखवले

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या सोबत गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीटरवरून तिचे कौतूक केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तू एखाद्या चॅम्पियनप्रमाणे लढा दिलास. त्याबरोबरच त्यांनी लोवलिनाचे अभिनंदनदेखील केले आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करताना लोवलिनाने भारताला पुन्हा एकदा आनंदित होण्याचे कारण दिले आहे असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देकील ट्वीट करून लोवलिनचे अभिनंदन केले आहे. त्यात त्यांनी आम्हाला तुझा अभिमान वाटतो असे म्हटले आहे.

Exit mobile version