नाटू नाटू या आरआरआर या चित्रपटातील गाण्याला ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आल्यामुळे आता देशभरातच नव्हे तर जगभरात या गाण्याची अधिक चर्चा रंगू लागली आहे. सर्वाधिक सर्चमध्ये नाटू नाटू हा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ काय, त्या गाण्यामागील पार्श्वभूमी काय, कोण आहेत या गाण्याचे गायक, संगीतकार, गीतकार याचा शोध आता लोक मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हा विषयच प्रचंड ट्रेंडिंग आहे.
या गाण्याच्या एकूणच सगळ्या प्रक्रियेसाठी १९ महिन्यांचा कालावधी लागला होता. किरवाणी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तर चंद्रबोस यांचे शब्द आहेत. मूळ तेलुगू भाषेत हे गाणे असून हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा भाषांमध्येही ते आहे. हिंदीत नाचो नाचो हे शब्द त्याजागी वापरण्यात आले आहेत तर तमिळमध्ये नट्टू कूठू, कन्नडमध्ये हळ्ळी नाटू, मल्याळममध्ये करिनोथुल या शब्दांचा उपयोग करण्यात आला आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी या गाण्यात आपल्या जबरदस्त नृत्याने अधिक रंग भरले आहेत. गोल्डन ग्लोब पुरस्कारानेही या गाण्याला सन्मानित करण्यात आले होते. हा भारतीय आणि आशियातील एखाद्या गाण्याला मिळालेला पहिला पुरस्कार होता.
हे ही वाचा:
‘मेघदूता’ वरील सुहास लिमये यांचे पुस्तक प्रकाशित
का साजरी करतात ‘एकनाथ षष्ठी’ ..जाणून घ्या
१२ मार्चनंतर आणखी एक बॉम्बस्फोट झाला असता पण….
इन्फ्लुएंझा विषाणूचे पुद्दुचेरीमध्ये ७९ रुग्ण
किरावाणी यांनी तब्बल २० वेगवेगळे संगीत या गाण्यासाठी दिले होते. त्यातून मग शेवटी आताचे नाटू नाटू हे गाण्याचे संगीत निवडण्यात आले. नाटू नाटू या शब्दाचा नेमका अर्थ इंग्रजी स्थानिक, ग्रामीण, पारंपरिक असा असून चंद्रबोस यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणीवरून हे गीत लिहिले आहे. चंद्रबोस यांनी हे गाणे अर्ध्या दिवसात पूर्ण केले पण उरलेले १० टक्के गाणे लिहिण्यासाठी त्यांना तब्बल एक वर्ष आणि ७ महिने लागले. किरावाणी यांनी या गाण्यात दक्षिण भारतीय संगीतातील ६ ते ८ वेगवेगळे ताल वापरले आहेत.