जगातील लोकसंख्येला मुस्लिम जबाबदार, भारतातही तीच परिस्थिती !

आयएएस नियाज खान यांच्याकडून संताप व्यक्त

जगातील लोकसंख्येला मुस्लिम जबाबदार, भारतातही तीच परिस्थिती !

मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी मौलवी आणि मदरसा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी झपाट्याने वाढणाऱ्या मुस्लिम लोकसंख्येवर निशाणा साधला आहे. आयएएस अधिकारी नियाज खान अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि पोस्ट्समुळे चर्चेत असतात. नियाज खान पुन्हा एकदा पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी वाढत्या मुस्लिम लोकसंख्येवर प्रश्न उपस्थित केला आहे.

आयएएस अधिकारी नियाज खान यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले की, जगात ज्या प्रकारे मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आफ्रिकेत दहा मुले जन्माला येत आहेत. आपल्या देशातही खालच्या वर्गाची हीच परिस्थिती आहे. जोपर्यंत मौलवी-मदरसा व्यवस्था सुरू आहे, तोपर्यंत तार्किक विचार होणार नाही. केवळ योग्य शिक्षणच यावर नियंत्रण ठेवू शकते, असे अधिकाऱ्याने लिहिले आहे.

हे ही वाचा:

बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला!

आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींच्या पक्षाच्या नेत्याची भररस्त्यात हत्या !

कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थाच्या दुकानावर मालकाचे नाव लिहा!

धोतर परिधान केल्यामुळे शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा बेंगळुरू मॉल तात्पुरता बंद !

दरम्यान, असे ट्विट किंवा विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही त्यांनी एमपीमध्ये सुरू असलेल्या धर्मांतराच्या वादावर मुस्लिमांना सल्ला दिला होता. त्यांनी मुस्लिमांना गायी पाळण्याचे आवाहन करून शाकाहारी बनण्यास सांगितले होते. तुम्ही कोणावरही धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करू नका, असेही ते म्हणाले होते.

Exit mobile version