25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेषविरोधी पक्षांच्या एकजुटीनेही भाजपचे नुकसान नाही!

विरोधी पक्षांच्या एकजुटीनेही भाजपचे नुकसान नाही!

''१६० जागांवर वर्षभरापूर्वीपासूनच भाजपने सुरू केली तयारी''

Google News Follow

Related

विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकजुटीचा निर्धार केला असला तरी भाजप आपल्या निवडणुकीच्या ‘रणनितीपासून मागे हटलेला नाही’. भाजपने गमावलेल्या आणि कमकुवत असलेल्या १६० जागांवर वर्षभरापूर्वीच तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय, जिंकलेल्या ‘३०० जागा’ कायम ठेवण्याचाही प्रयत्न कमी पडू दिलेले नाहीत. या जागांवर काही ठिकाणी बदल केले जातील व नव्या समीकरणालाही भाजप स्वीकारेल.

जुने सहकारी सोडून जाण्याने तसेच, नवे सहकारी मिळाल्याचाही परिणाम होईल. मात्र जागांमध्ये खूप तफावत असेल, अशी शक्यता धूसर असल्याचे भाजपला वाटते. ‘पाटण्यामध्ये जमलेल्या १५ विरोधी पक्षांजवळ’ सुमारे १३६ जागा आहेत. त्यातील काँग्रेसजवळ ३६ जागा आहेत. तर, अन्य पक्ष म्हणजेच जनता दलाकडे (संयुक्त) १६, तृणमूल काँग्रेसजवळ २३, द्रमुकजवळ २४, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाच, झारखंड मुक्ती मोर्चाकडे एक, नॅशनल कॉन्फरन्सजवळ तीन, आम आदमी पक्षाकडे एक, कम्युनिस्ट पक्षाकडे दोन, समाजवादी पक्षाकडे तीन व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे तीन जागा आहेत. तर, या आघाडीपासून दूर राहिलेल्या बिजू जनता दलाकडे १२, व्हायएसआरसीपीकडे २२, बीआरएसकडे नऊ, अकाली दलाकडे दोन, बहुजन समाजवादी पक्षाकडे नऊ, तेलुगु देशमकडे तीन, मुस्लिम लीगकडे तीन, एआयएमआयएमकडे दोन, एआययूडीएफकडे एक, जनता दल (सेक्युलर)कडे एक, केरळ काँग्रेसकडे एक, आरएलपीकडे एक, आरएसपीकडे एक, एसएडी मानकडे एक अशा ६८ जागा आहेत.

हे ही वाचा:

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

मर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले…

पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय

‘पंतप्रधान मोदी’ आणि ‘इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मादबौली’ यांची भेट!

कुठे कमी होतील, कुठे वाढतील

भाजपकडे स्वत:च्या ३०१ तर, राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे ३२९ जागा आहेत. मात्र भाजपने निवडणुकीसाठी आधीच तयारी सुरू केली होती. त्यामुळे विरोधी पक्षांच्या या एकजुटीमुळे फारसा फरक पडणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. काही जागा कमी होतील, पण काही जागा वाढतीलही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधी पक्षांकडे कोणताही चेहरा नाही. विरोधी पक्षांमध्ये याआधीच मतभेद आहेत आणि राज्या-राज्यांत वादही आहेत. त्यामुळे त्यांच्यात कसा समन्वय साधला जाईल, हा प्रश्नच आहे. भाजपच्या प्रमुख नेत्याने असा दावा केला की, विरोधी पक्षांकडे सरकार किंवा विकासाचा कोणताही अजेंडा नाही. त्यांना केवळ मोदींना हरवून सत्ता हातात घ्यायची आहे. हे लोक पाहात आहेत.

वर्षभरापासून तयारी

भाजपने एक वर्षापूर्वीच १६० जागांवर तयारी सुरू केली आहे. या जागांवर भाजप एकतर दुसऱ्या क्रमांकावर होता किंवा खूप कमी फरकाने निवडणूक जिंकला होता. भाजपने तयारी केल्यामुळे यातील किमान निम्म्या जागा पक्ष जिंकू शकेल, असा दावा भाजपतर्फे केला जात आहे. त्यामुळे जर अन्य कुठल्या जागा कमी झाल्या तर या जागांनी त्याची भरपाई होऊ शकेल, असे भाजपतर्फे सांगितले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा