बारामतीची गढी वाचवायची असेल तर तुम्हालाच मैदानात उतरावे लागेल असे कोणी कानात सांगितले आहे का? पण तुम्ही उतरलात तरी घडायचे ते घडणारच…,” असा टोला भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. आमदार भातखळकर यांनी केलेले हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
हेही वाचा..
पंतप्रधान मोदींचा केरळ दौरा, लोकांच्या प्रचंड गर्दीने विरोधकांमध्ये भरली धडकी!
पोल बाँड्सने राजकारणातील काळा पैसा संपवला
बुमराह सराव शिबीराला अजूनही अनुपस्थित, मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय?
पुन्हा पुन्हा स्वतःला लॉन्च का करावे लागते?
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, कार्यकर्ते आग्रह करत आहे. मी पुणे, सातारा किंवा माढा मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा आहे. माझ्या राजकीय जीवनात 14 निवडणुका लढलो आहे. या त्यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा गड असलेल्या बारामतीमध्ये निवडणूक घोषणा होण्याआधीच चुरस निर्माण झाली आहे. महविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याने तिथे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांचा काय आग्रह आहे. कार्यकर्ते मला पुणे, सातारा किंवा माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.