राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत करण्यासाठी उद्धव यांनी तळागाळातील लोकांना भेटण्यासाठी अंडरग्राऊंड मिशन सुरु करणार असल्याचे विधान केले होते, त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती महाराष्ट्रात कमकुवत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये दोन जरी जागा देण्यात आल्यास तरी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी मध्ये राहतील. हा पक्ष कमकुवत झाला असून ‘अंडरग्राऊंड’ झाला आहे, अशी उपरोधिक टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांची अंडरग्राऊंड टीम तयार केली आहे. यावर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचा पक्षच अंडरग्राऊंड झाला असून आगामी काळातील निवडणुकीमध्ये हम दो हमारे दो अशी स्तिथी होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
राहुल गांधी यांचा शिवाजी महाराज गाण्यावरचा विडिओ सध्या सोशल मीडिया वर वायरल होत आहे, होणाऱ्या विडिओ बाबत विचारले असता ते म्हणाले, राहुल गांधी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्या सोबत होऊ शकत नाही.काँग्रेस पक्षाने हा विडिओ त्वरित मागे घ्यावा ,आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात आम्ही आंदोलन करू असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
हे ही वाचा:
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णवीर नीरज चोप्रा भालाफेकीत जगात पहिल्यांदा ठरला अव्वल
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीस म्हणाले, मोदी म्हणजे ‘द बॉस’
‘आपला’ तो बाब्या’ दुसऱ्या’चं ते कार्ट असं कसं चालेल?
कंटेनरचा ब्रेक फेल, सहा कारना धडक, १ ठार
आगामी काळातील निडणुकीबाबत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार का आणि जागा वाटप यात काही ठरलय का असे विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, भाजप आणि शिवसेना पक्ष पुढील निवडणुका एकत्र लढणार असून जागे वाटपाबाबत अजून काही ठरलेलं नाही तसेच आमच्या पक्षात जागेवाटप बाबत कोणीही नाराज नसल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असे विचारल्यास त्यांनी मिश्किल उत्तर देत बावनकुळे म्हणाले, मी आता सध्या प्रदेशाध्यक्ष पदावर आहे. त्यामुळे पदाचे जे काम करायचे असते ते मी करतो.अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे सांगितले तसेच स्टॅम्प वर लिहीन देऊ का असे सुद्धा म्हणाले. त्यावर बावनकुळे म्हणाले, अजित पवारांनी आता फक्त भगवद् गीतेवर हात ठेवून बोलायचे राहिले आहेत. मागील काही दिवसापूर्वी शरद पवारांनी राजीनामा दिला हा त्यांनी ठरवून केलेला चित्रपट होता. आपल्या पक्षातील लोक बाहेर कोणत्या पक्षात तरी गेले नाहीत ना? अशी भीती बाळगून हे सर्व नाटक त्यांनी सादर केल. तसेच राजीनाम्याचा तमाशा महाराष्ट्रापुढे सादर केला. महाविकास आघाडीमध्ये आता कोणी नेता उरलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आणि सहा तोंडे अशी परिस्थिती झाली आहे. उठसूठ एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दोन जागा दिल्या तरी लाचारीपणाने त्या स्वीकारतील पण महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार नाहीत. कारण त्यांना भाजप पक्षाला पराभूत करायचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.