केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला देशाच्या विविध भागांमध्ये मुस्लिम संघटनांकडून विरोध केला जात आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देखील या विधेयकाविरुद्ध सतत आवाज उठवत आहे आणि निषेधही करत आहे. याच दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘कोणतीही जमीन जी वक्फची जमीन आहे आणि तिच्यासाठी कोणतेही कागदपत्रे नसली तरीही ती वक्फचीच जमीन आहे.’
हैदराबादच्या मीर आलम मशिदीत नमाज पठणापूर्वी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी म्हणाले, “कोणतीही जमीन जी वक्फची जमीन आहे आणि जरी त्यासाठी कोणतेही कागदपत्र नसले तरी ती वक्फचीच जमीन आहे. शाहजहानच्या काळातील जामा मशिदीचे कागदपत्रे आपल्याला कुठून मिळणार?, असा सवाल त्यांनी केला.
हे ही वाचा :
ज्ञानेन्द्र शाह यांनी गणराज्याविरोधात कट रचल्याचा आरोप
बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा देताना विरोधकांवर निशाणा
धोनीचा बॅटिंगक्रम खाली येण्याने चेन्नई सुपर किंग्जला किती फायदा ?
संभलमध्ये ईदच्या नमाजासाठी कडेकोट बंदोबस्त
मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी पुढे म्हणाले, गैर मुस्लीम आमच्या समितीमध्ये राहून आमच्याशी न्याय करू शकतील का?. जर कोणी १२-१३ वर्षांपासून वक्फच्या जमिनीचा ताबा घेतला असेल तर तो बेकायदेशीर कब्जा असूनही त्याच्या नावावर हस्तांतरित केली जाईल. आमच्या निजामाने भेदभाव केला नाही. निजामाने हिंदूंसाठी जितके केले तितकेच मुस्लिमांसाठी केले. त्याचप्रमाणे हिंदू राजे आणि संस्थांनी मुस्लिमांना जमिनी दिल्या होत्या. पण अशा जमिनी वक्फ विधेयकातून वगळल्या जातील, असे मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी म्हणाले.