महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे असा इशारा केंद्र सरकारने देऊनही, राज्य सरकारने लसीकरणाच्या मोहिमेवर गांभीर्याने लक्ष दिलं नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ ४४ टक्केच लशींचा वापर केला गेला आहे. याशिवाय कोविड-१९ च्या चाचण्याही कमी प्रमाणात केल्या जात आहेत. कोविड-१९ च्या चाचण्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर हा गोव्याच्याही मागे असल्याचे आकडे समोर आले आहेत.
“देशातील कोणत्याही अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. याला राज्यातील प्रमुख शहरातील लोकसंख्येच्या घनतेपासून वेगवेगळ्या राज्यातून कामासाठी येणारी लोक तसेच अनेक घटक जबाबदार आहेत. मधल्या काळात ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांची रणधुमाळी तसेच लग्नसमारंभ आदी कार्यक्रम यातून सोशल डिस्टंसिंगचे बारा वाजणे तसेच मास्क न वापरणे आदी अनेक कारणे आहेत.” असे मत ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी मांडले आहे.
हे ही वाचा:
वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक
सचिन वाझेला मुंबई पोलिसांपासून वाचवा, अन्यथा त्यांचा मनसुख हिरेन होईल
ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींच्या ‘विकास होबे’ने उत्तर
राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?
महाराष्ट्रातील कोविड-१९ च्या चाचण्यांचे प्रमाण हे गोव्यासारख्या छोट्या राज्यापेक्षाही कमी आहेत.महाराष्ट्रात दहा लाख लोकांमागे १,३४,२२५ चाचण्या केल्या जातात. गोवा राज्यात हेच प्रमाण ३,३३,९६७ तर गुजरातमध्ये १,८१,३६३,दिल्ली ६,७१,०४५ , छत्तीसगढ १,८०,२५९,केरळ ३,४९,९२७ आणि कर्नाटकमध्ये ३००७७८ चाचण्या करण्यात येतात. यातून महाराष्ट्रातच चाचण्यांचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.