32 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरविशेषबंदी नंतरही फटाके फोडल्याने दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली

बंदी नंतरही फटाके फोडल्याने दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली

सर्वत्र धुराचे ढग

Google News Follow

Related

देशभरात दिवाळीचा उत्साह असतानाच दिल्लीत मात्र पुन्हा एकदा प्रदूषणाने डोके वर काढले आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच फटाक्यांमुळे एका रात्रीत दिल्लीची हवा पुन्हा एकदा अत्यंत वाईट पातळीवर पोहोचली आहे. दिल्लीत फटाके बंदी लागू करण्यात आली होती मात्र तरीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडत फटाक्यांच्या बंदीचे उल्लंघन केले. याचा परिणाम म्हणजे प्रदूषणाची पातळी वाढली आहे.

गुरुवारी दिवाळीच्या रात्री दिल्लीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे शहरात सर्वत्र विषारी वायू पसरला असून प्रदूषण इतके वाढले आहे की श्वास घेणे कठीण झाले आहे. सर्वत्र धुराचे ढग जमले असून दृश्यमानता कमी झाली आहे. फटाक्यांमुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पोहोचली आहे.

हे ही वाचा : 

छत्रपती संभाजी नगरमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

“भारत आपल्या सीमेच्या एक इंच भागाचीही तडजोड करू शकत नाही”

मनोज जरांगेंची तुलना थेट गांधी आणि आंबेडकारांशी

सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण

सकाळी सहा वाजता दिल्लीच्या आनंद विहारमध्ये हवेची गुणवत्ता ३९५ इतकी नोंदवली गेली, जी अत्यंत खराब आहे. गुरुवारी रात्री १० वाजता दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक ३३० नोंदवण्यात आला. शहरातील हवेत श्वास घेण्यास धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दिवाळीत शहरातील प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. प्रतिकूल हवामान, जाळपोळ आणि वाहनांमधून निघणारा धूर यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. आनंद विहारसोबतच अशोक विहारचीही अवस्था फारशी चांगली नाही. येथे सकाळी सहा वाजता AQI अत्यंत खराब ३८४ नोंदवला गेला. द्वारका येथे AQI सकाळी सहा वाजता ३७५ नोंदवला गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याच्या आदेशानंतरही दिल्लीत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. जहांगीरपुरी आणि आरकेपुरममध्ये दिवाळीच्या रात्री प्रदूषण विक्रमी पातळीवर पोहचले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा