दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मंगळवारी (१० डिसेंबर) बांगलादेशी घुसखोरांपासून दिल्ली रिकामी करण्याचे आदेश दिले. यासाठी त्यांनी २ महिने विशेष मोहीम राबवण्यास सांगितले आहे. एलजी सचिवालयाने मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहून राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर ‘कठोर कारवाई’ करण्याचे निर्देश दिले आहेत.
एलजी सचिवालयाने मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना दोन महिने चालणारी विशेष मोहीम सुरू करण्यास सांगितले आहे, ज्या अंतर्गत दिल्लीतील बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय राजधानीत अवैध घुसखोरांचा वाढता प्रभाव आणि सुरक्षेची चिंता लक्षात घेवून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांबद्दल हजरत निजामुद्दीन दर्गा आणि बस्ती हजरत निजामुद्दीन येथील उलेमा आणि मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी एलजी व्हीके सक्सेना यांची भेट घेतल्यानंतर हा विकास झाला. दिल्लीत राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
हे ही वाचा :
पवारांची सौ सुनार की झाली, आता एक लोहार की झेला…
‘प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट’
ईव्हीएमवर दोन वेळा केंद्रात सत्ता भोगली, आता ओरडत आहेत!
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव