ईव्ही क्षेत्रातील कंपनी राज्यात २००० कोटींची गुंतवणूक करणार; ४००० रोजगार निर्मिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

ईव्ही क्षेत्रातील कंपनी राज्यात २००० कोटींची गुंतवणूक करणार; ४००० रोजगार निर्मिती

महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच आता राज्यात एक बडी कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इलेक्ट्रॉनिक व्हेईकल म्हणजेच ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ईव्ही दुचाकी निर्माण करणारी एथर ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यामुळे जवळपास ४००० रोजगार निर्माण होतील. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प डीएमआयसीमध्ये उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. अधिकाऱ्यांनी जागेचीही पाहणी केली होती. शिवाय येथील सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली होती. सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन डीएमएआयसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. एथर एनर्जी ही कंपनी लवकरच ऑरिक सिटीच्या बिडकीन एमआयडीसीमध्ये १०० एकरावर आपला प्रकल्प उभारणार आहे. एथरचा हा तिसरा उत्पादन प्रकल्प आहे. या कंपनीला हिरो मोटो कॉर्पचे आर्थिक पाठबळ आहे. ही कंपनी राज्यात २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे सुमारे ४००० रोजगार उपलब्ध होणार आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून; ‘हे’ मुद्दे गाजण्याची शक्यता

‘ओवेसीची जीभ छाटा अन पारितोषिक घेवून जा’

प्रेमजाळ्यात अडकवून एका हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

केनियात करवाढीला विरोध करताना संसद भवनावर हल्ला, १० ठार

एथरचा प्लांट दरवर्षी १ दशलक्ष युनिटपर्यंत वाहने आणि बॅटरी पॅक दोन्ही तयार करणार आहे. एथरने मराठवाड्याची केलेली निवड महाराष्ट्राच्या विकासकथेचे नेतृत्व करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सुविधा असलेली लॅण्ड बँक ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये उपलब्ध आहे. यामुळे येथे मोठा अँकर प्रकल्प यावा यासाठी सीएमआयएचे पदाधिकारी दोन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत होते. सीएमआयएने एमजीएममध्ये आयोजित कॉन्फरन्समध्ये एथरचे सहसंस्थापक स्वप्निल जैन यांना आमंत्रित करून व्हेंडर साखळी एथरसाठी पूरक असल्याचा विश्वास दिला होता.

Exit mobile version