महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत, हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी ‘आमचे उद्धव काका’ या विषयावर निबंध लिहिण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळण्याचा आणखी एक प्रयत्न केला जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी हा निबंध लिहून पाठवण्याचे आवाहन कोथरुडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘उद्धव काका’ म्हणून कसे वाटतात हे आता लिहायचे आहे.
गेल्या काही सर्वेक्षणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे देशात सर्वाधिक लोकप्रिय आहेत, हे सांगण्याचा आटापीटा रोज होत आहे. मध्यंतरी १३ राज्यांतील अवघ्या १७ हजार लोकांच्या मतांच्या आधारे उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे समोर आले होते. त्याआधीही काही वर्तमानपत्रांनी प्रश्न विचारत कोणते मुख्यमंत्री सर्वोत्तम आहेत अशी विचारणा केली होती आणि त्यातूनही उद्धव ठाकरे हेच सर्वोत्तम असल्याचे सिद्ध केले होते. त्याचाच आता हा नवा आविष्कार निबंधाच्या रूपात पाहायला मिळणार आहे.
हे ही वाचा:
विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना ५० हजार रुपये द्या
…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार
‘विस्मरणा’मुळे संजय राऊत झाले निःशब्द!
२०३२ चे ऑलिम्पिक ‘या’ शहरात होणार…
फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपण राज्यातील प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्य असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने केला जातो आहे. ते कसे पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत याचा उल्लेखही वारंवार केला जातो. ते कोविडोलॉजिस्ट असल्याचेही कौतुक केले जाते.
‘भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता याबाबतीतही जाणत्या ‘काकां’च्या स्पर्धेत उतरले आहेत. आमचे उद्धव काका…’ अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या निबंध स्पर्धेवर चिमटा काढला आहे.