सांताक्रूझ पूर्व वाकोला पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलीस कोठडीतील बाथरूमच्या खिडकीचे गज वाकवून पलायन केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा समोर आली आहे. या घटनेमुळे वाकोला पोलीस ठाण्यात एकच खळबळउडाली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
महेश गुरव (२७) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. महेश गुरव याला वाकोला पोलिसांनी सोमवारी एका घरफोडी प्रकरणात अटक केली होती.मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरव याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला वाकोला पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यापूर्वी त्याने लघुशंका आल्याचे पोलिसांना सांगितले.पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यातील शोचालयात जाण्यास सांगून एक पोलीस शिपाई शोचालयाच्या बाहेर थांबलेले होते.
हे ही वाचा:
निवडणुकीच्या लगबगीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आयईडी स्फोटात दोन जवान हुतात्मा
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईला महाडमधून अटक
चीनमध्ये मॉलला लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू
बराच वेळ होऊन आरोपी गुरव हा बाहेर येत नसल्यामुळे पोलीस शिपाई हे बघायला गेलं असता शोचालयाचे दार आतून बंद होते.पोलिसांना संशय येताच त्यांनी शोचालयाच्या मागे जावे तपासले असता शोचालयाच्या खिडकीचे गज वाकलेले होते, तेथून गुरव या आरोपीने पळ काढल्याचे समोर आले.आरोपी पळून गेल्याचे कळताच त्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे. महेश गुरुव याला सोमवारी रात्री सांताक्रूझ (पूर्व) येथील एका सलून मालकाच्या घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती,पोलिस कोठडीतून पळून गेल्या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.