शनिवारी एक हिंदू कार्यकर्ते देवदत्त माळी यांनी एक्सवर एका २३ वर्षीय हिंदू मुलीची सुटका केल्याबद्दल माहिती दिली आहे. या मुलीला मिझानुर गाझी नावाच्या एका व्यक्तीने आमिष दाखवून फसवले आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी माहिती दिली की, पीडित महिला पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बसीरहाट शहरातील रहिवासी आहे. देवदत्त माळी पुढे म्हणाले की, महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील अमरावती शहरातून हिंदू मुलीची सुटका करण्यात आली.
माळी यांनी एक भावनिक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यात ही पीडित मुलगी तिच्या पालकांसोबत एकत्र येताना दिसत आहे. देवदत्त माळी यांनी २३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या टीमकडून माहिती मिळाल्यानंतर कोलकाता ते अमरावती १३०० किलोमीटरची गाडी चालवल्याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार पीडितेची २६ फेब्रुवारी रोजी मुस्लिमबहुल हबीब नगर येथून यशस्वीरित्या सुटका करण्यात आली.
हेही वाचा..
आरजी कार प्रकरण : ११ पोलीस कर्मचाऱ्याना सीबीआयचे समन्स
काँग्रेसने रोहित शर्माची खिल्ली उडवताच भाजप आक्रमक
नवी मुंबईत ‘छावा’ चित्रपटात मस्करी करणाऱ्यांना प्रेक्षकांनी गुडघ्यांवर बसवले!
चक्रवर्तीचे फिरकी चक्र चालले, न्यूझीलंडला नमवून भारत उपांत्य फेरीत
पीडित मुलीच्या पालकांना आणि इतर कुटुंबातील सदस्यांना इतर जिहादी तस्करांकडून आणि मिजानूर गाझीच्या कुटुंबियांकडून धमक्या येत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या मुलींना लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी आणि एलजे आणि डेमोग्राफी चेंजबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. देवदत्त माळी हे ‘सिंह वाहिनी’ या हिंदू संघटनेचे अध्यक्ष आहेत. २०२१ ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक त्यांनी चौरंगी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढवली होती.