भारतातील प्रसिध्द उद्यगोपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. थोड्याच वेळात राहुल बजाज यांचे पार्थिव रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून, रविवारी संध्याकाळी चार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. बजाज उद्योग समुह हा देशातील टॉप उद्योग समुहांपैकी एक आहे. बजाज ऑटोला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बजाज उद्योग समुहाच्या माध्यमातून देशात मोठ्याप्रमाणात रोजगार त्यांनी निर्माण केला. राहुल बजाज यांनी या उद्योग समुहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कार्याची दखल म्हणून २००१ मध्ये राहुल बजाज यांचा भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.
गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती.ध्यक्षपदाची धुरा ही नीरज बजाज यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘राऊत आणि परबांसाठी अनिल देशमुखांच्या बाजूच्या खोल्या सॅनिटाइज कराव्यात’
हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममता बॅनर्जींना झटका! अधिवेशन केले बरखास्त
‘भाजपने खंजीर खुपसला, आम्ही मात्र मैत्री जपतो’
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. त्यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. पुढे त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चे शिक्षण घेतले. १९६८ मध्ये राहुल बजाज हे बजाज ऑटोमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदावर रुजू झाले. १९७२ मध्ये त्यांनी ‘बजाज ऑटो’ची सूत्रे हाती घेतली. आणि त्यांनी भारतात बजाज कंपनीला नावारूपाला आणले.