26 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरविशेषनवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू

नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू

सण-उत्सवासाठी दोन वर्षानी वस्तू खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या.

Google News Follow

Related

शिंदे-फडणवीस सरकारने सर्व सणांवरील निर्बंध हटवल्यामुळे सर्वच सण-उत्सव मोठ्या धूम-धडाक्यात साजरे होत आहेत. अशातच आता कोणत्याही निर्बंधविना गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आता भाविकांना वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाला सोमवारी पासून सुरू आहेत. पितृपक्षामूळे सुस्तावलेले वातावरण आता पुन्हा गर्दीने ओसंडून वाहणार आहे. त्यासाठी बाजारातील सर्व विविध विक्रेते फळ-फूले, पूजेचे इतर साहित्य व पुढे येऊ घातलेल्या दिवाळीसणासाठी आगाऊ खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी करत आहेत.

सोमवारी विधिवत पूजा करून घट बसवले जातील. मोठमोठ्या मंडळात देवीची मूर्ती स्थापन होईल. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे कोणतेही सण-उत्सव धूम-धडाक्यात साजरा करण्यात आले नव्हते. आता मात्र भाविक बाजारात पूजेचे साहित्य, देवीच्या मूर्ती, पूजेसाठी लागणारी फळ-फुले, सजावटीसाठी लागणारे साहित्याचे स्टॉल बाजारात ठिकठीकाणी उभारण्यात आले आहेत. दादर, परेल, लालबागच्या बाजारांना सध्या यात्रेचे रूप आले आहे. त्याच बरोबर बाजारात भाविकांची बंगाली मूर्तीची मागणी देखील वाढत चालली आहे.

नवरात्रोत्सव पाठोपाठ गडबड चालू होईल, ती दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळीची या सणाला झगमगत्या सणाला खास आरास असते ती पणत्याची, मुंबईमधील धारावी येथील कुंभारवाड्यात सणांसाठी लागणारी विशेष मातीची भांडी वर्षभर उपलब्ध असतात. त्यामुळे पितृपक्ष संपल्यानंतर, नवरात्रोत्सव आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या मातीच्या भांडी बनवण्याची लगबग धारावीतील कुंभारवाड्यात चालू होते. तसेच ही मातीची भांडी बनवण्यासाठी खास गुजरातहून माती आणली जाते. चिकटपणा हे या मातीचे वैशिष्ट्य आहे. साधारणतः नवरात्रीमध्ये घट बसवण्यासाठी, तसेच देवीच्या पुढे वेगवेगळ्या धान्याची आरास ठेवण्यासाठी मातीची मडकी किंवा आकर्षक गारवे माफक किमतीत उपलब्ध असतात. तसेच दिवाळीसाठी खास आकर्षक रंगीबेरंगी पणत्या तयार करून विक्री करतात. एवढंच नाही तर या पणत्या बाहेरील देशात सुद्धा विकल्या जातात. त्यामुळे वर्षाकाठी १० ते १५ कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायात होत असते.

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

तसेच मागील दोन वर्षापासून कोरोनामूळे कुंभार व्यवसाय डबघाईला आला होता. त्यामुळे कामगारांच्या रोजगारीवर मोठ्या प्रमाणात फरक पडू लागला. मात्र, यंदा हे चित्र वेगळं असून निर्बंध हाटवले आहेत. त्यामुळे मालाला वाढती मागणी असल्यामुळे कामगारांनाही आर्थिक स्त्रोत उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा