जम्मू काश्मीरमधील पहिल्याच निवडणुकीला मतदारांच्या रांगा!

मतदानात उत्साह, ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर लोकशाहीचा उत्सव

जम्मू काश्मीरमधील पहिल्याच निवडणुकीला मतदारांच्या रांगा!

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मतदान होत असल्याने लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. श्रीनगर, गंदरबल, बडगाम, पुलवामा आणि शोपियान या पाच जिल्ह्यांमध्ये २१३५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या फेरीत श्रीनगर जागेवर मतदान होत आहे.विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील ‘कलम-३७०’ हटवल्यानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडून आहे.

श्रीनगर लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासूनच मतदानासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदान सुरू होण्यापूर्वीच लोक मतदान केंद्रांवर उभे असल्याचे दिसून आले. श्रीनगरच्या बाहेरील भागात लोकांची मोठी गर्दी दिसून आली. मतदानाचा अर्थ आपल्याला कळला असून यातूनच बदल घडू शकतो, असे प्रथमच मतदानासाठी आलेल्या काही तरुणांचे म्हणणे आहे. लोकांचे म्हणणे आहे की, पूर्वी येथे मतदानावर बहिष्कार घातला जायचा पण आज बदल दिसत आहे. यावेळी मतदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहोचत आहेत.

हे ही वाचा:

‘पेज थ्री संस्कृतीवर महाराष्ट्र चालवता येत नाही’

प्रशासनाच्या आदेशानंतरही गुजरातमधील जामनगरच्या रणजितसागर धरणावरील बेकायदा दर्गा ‘जैसे थे’

शादाब, शोएबकडून अल्पवयीन दलित मुलीचा विनयभंग!

‘पगडी घालून पंतप्रधान मोदी पोहचले गुरुद्वारात, स्वतः रोटी लाटून जेवणही वाढलं’

श्रीनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १७,४७,८१० लाख मतदार आहेत, ज्यात ८,७५,९३८ पुरुष आणि ८,७१,८०८ महिला मतदार आहेत.यासाठी एकूण २१३५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.तसेच मतदानाच्या दिवशी सुमारे ८,५०० मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

महिलांसाठी २० मतदान केंद्रे व्यवस्थापित करण्यात आली आहेत (ज्यांना गुलाबी मतदान केंद्र म्हणूनही ओळखले जाते), १८ मतदान केंद्रे विशेष दिव्यांग व्यक्तींसाठी व्यवस्थापित करण्यात आली आहेत. स्थलांतरित मतदारांसाठी जम्मूमध्ये २१, दिल्लीमध्ये ४ आणि उधमपूर जिल्ह्यात १ मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच २६ विशेष मतदान केंद्रे देखील उभारण्यात आले आहेत.

 

Exit mobile version